चार महिन्यांपासून मराठवाड्यावर रुसलेल्या पावसाचे दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात पुन्हा आगमन झाले. शनिवारी सकाळपासून संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम आणि हलक्या सरींचा पाऊस पडला. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मराठवाड्यात ५.५ मिमी, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ११.५ मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पाच्या ऊर्ध्व भागात जोरदार पाऊस पडत असल्याने २४ तासामध्ये जायकवाडी प्रकल्पात ६०८१ क्यूसेक पाण्याची आवक झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ३९ कृषी मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. यामुळे या मंडलातील पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. शिवाय या पावसाचे पाणी जमिनीत मुरायला लागल्याने भूजल पातळीत वाढ होईल. शनिवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसाचा फायदा विविध पिकांना होणार आहे.- प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक
मराठवाड्यातील नांदेड आणि धोकादायक स्टंट करत काही जणांनी व्हिडीओ काढले. हिंगोली वगळता उर्वरित सहाही जिल्ह्यांमध्ये यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे. आजही छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील नदी, नाल्यांना एकही मोठा पूर आला नाही. परिणामी, येथील लहान-मोठी सर्वच धरणे कोरडी पडली आहेत. यामुळे मराठवाड्यातील अनेक गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवावे लागत आहे. अशा परिस्थितीत दोन दिवसांपासून वरुणराजा मराठवाड्यावर मेहरबान झाल्याचे दिसत आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी सकाळपासून आकाशात काळे ढग दाटून आले होते. सकाळी पावणे बाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
आष्टी तालुक्यातील बावीत ढगफुटीसदृश पाऊस
• बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. तीन तास झालेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले.
• बावी येथे ढगफुटीसदृश पावसामुळे नदीला पूर आला. पुरात तीन शेळ्या, एक बोकड वाहून गेला असून, दोन म्हशींना वाचवण्यात यश आले.
• कोहिणी गावालगतच्या नदीपात्राला अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात धोकादायक स्टंट करत काहीजणांनी व्हिडिओ काढले.
मराठवाड्यातील प्रमुख धरणांचा जलसाठा
जायकवाडी ३४.३९%
माजलगाव ११.२८%
मांजरा २४.११%
विष्णुपुरी ११.३४%
वीज पडून सात शेळ्या जागीच ठार
■ कुरुंदा (जि. हिंगोली) : अचानक आलेल्या पावसात वीज पडून सात शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना वसमत तालुक्यातील पांगरा शिवारात शनिवारी सायंकाळी
■ शेळीपालन करून उदरनिर्वाह करणारे मारोती जोगदंड शनिवारी नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी पाटीलदरा या माळरानात गेले होते. तेथे ही घटना घडली.
काही ठिकाणी झाडे कोसळली• छत्रपती संभाजीनगरसुमारे दीड ते पावणे दोन तास पडलेल्या धो धो पावसाने छत्रपती संभाजीनगर शहर ओले चिंब झाले. यानंतर अवघा अर्धा तास ते पाऊण तास खंड दिल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. पाव- सासोबत वादळी वाराही असल्याने काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.
• जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे. मका आणि सोयाबीन, बाजरी पिकांची दाणे भरण्यास सुरुवात झालेली आहे, सरकीला कैया लागत असल्याने या पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे.