राज्यात काही भागात पावसाची तर काही भागात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर पुढील ३ दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. आज दिनांक १६ मे ते १९ मे पर्यंत पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील.
प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार आज दि १६ मे रोजी धाराशिव, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम राहणार असून दि १७ मे राेजी धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर दि १८ मे रोजी लातूर, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड व १९ मे रोजी लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.