एखादं देखणं झुंबर दिवाणखान्यात लटकलेलं दिसावं, तशा आकाराचा बहावा जेव्हा पूर्ण बहरुन जातो, तेव्हा पावसाळा जवळ आल्याचे संकेत मिळतात. अनेक ठिकाणी बहावा बहरला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही थांबवणारा पाऊस लवकरच येईल, अशी जणू सूचनाच मिळत आहे.
चांगल्या वाईट प्रत्येक गोष्टीचेच संकेत निसर्ग देतो. पशुपक्षी, वनस्पती यांच्या माध्यमातून तो बोलत असतो. बहरलेला बहावा हाही त्याचा माणसाला निरोपच. बहावाचं पूर्ण झाड पिवळ्या जर्द फुलांनी भरून जातं, तेव्हा समजून जावं की लवकरच पाऊस येणार आहे. आताही जागोजागी बहावाची झाडे बहरली आहेत.
चांगल्या पावसाची हमी■ पूर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणती आधुनिक साधने नव्हती. प्राणी, पक्षी आणि निसर्ग पावसाचा अंदाज द्यायचे. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज घेता येत असे आणि त्यादृष्टीने ते शेतीची कामे हाती घेत असत.■ बहावा या झाडाला किती फुले आली आहेत, यावरून किती प्रमाणात पाऊस पडणार किंवा पावसाळा कसा राहील, याचा अंदाज काढला जातो. त्यादृष्टीने फुललेला बहावा पाहता यंदा पाऊस वेळेवर आणि चांगला पडणार, असे संकेत मिळत आहेत.
बहुगुणी बहावा■ बहुगुणकारी हे बहावाचं वैशिष्ट्य. म्हणूनच अशा वृक्षांचं संवर्धन व्हायला हवं. निसर्गान मानवाला खूप काही दिले. मानवाच्या विकासात निसर्गाचे मोठे महत्त्व आहे. अनेक वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म आहेत. यावर्षी बहावा वनस्पतीला सर्वत्र मोठ्या प्रमाणात बहर आला आहे.■ बहुगुणी बहावा एक वनौषधी म्हणून उपयोगात आणला जातो. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष 'गोल्ड शॉवर ट्री' म्हणूनही ओळखला जातो. त्याची याच नावाने सर्वत्र ओळख आहे.
काय आहेत नावंमराठीत बहावा आणि कर्णिकार अशी त्याची नावे आहेत. 'कॅशिया फिस्टुला' या शास्त्रीय नावाने बहावा ओळखला जातो. संस्कृतमध्ये त्याला आग्वध म्हणतात तर त्याचं इंग्रजी नाव आहे Labernum.
चैत्राचा प्रसादसाधारणतः ८ ते १० मीटरपर्यंत उंच असलेला पाने संयुक्तपर्णी सम संख्येत, हिवाळ्यात पर्णहीन होणारा, द्राक्षांचे घड वेलीवर लोंबत रहावेत, तशा झुपक्यासारख्या दिसणाऱ्या आपल्या पिवळ्ळ्या फुलांच्या सौंदर्याने वेड लावणारा वृक्ष म्हणजे बहुगुणी बहावा. चैत्राचे आगमन झाले की, करंज, करवंद, गुलमोहर प्रमाणे पिवळ्या धमक फुलांनी बहरतो तो म्हणजे 'बहावा.
भुरळ पाडणारं सौंदर्यफिस्टुला म्हणजे पोकळ नळी, या दंडगोलाकार लांबलचक शेंगेतील गाभूळलेल्या चिंचेसारखा गर वानर, कोल्हा, अस्वल, पोपट हे प्राणी पक्षी आवडीने खातात. बहाव्याचा वृक्ष साधारणतः ८ ते १० मीटरपर्यंत उंच वाढतो. पाने संयुक्तपर्णी सम संख्येत म्हणजे ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून बनते. हिवाळ्यात हा वृक्ष पर्णहीन असतो. बहाव्याच्या झुबकेदार पिवळ्या फुलांचे सौंदर्य मनाला भुरळ पाडणारे असते.
अधिक वाचा: शेतकऱ्यांनो विंचू चावला कसे ओळखाल? कसा टाळाल विंचूदंश