राज्यात उकाड्यासह उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळणार असून आज बहुतांश राज्यात मुसळधार पावसाची हजेरी राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने वर्तवले.
राज्यात मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले असून मान्सून अरबी समुद्राच्या मध्य भागात सक्रीय असल्याचे हवमान विभागाने सांगितले. दरम्यान, आज राज्यात तळ कोकणासह बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
धुळे, नंदूरबार, जळगाव, मुंबई व पालघर हे जिल्हे वगळता हवामान विभागाने उर्वरित राज्याला पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
पुढील पाच दिवस मुसळधार!
मागील दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पावसाची वर्णी लागत असून नागरिकांसह शेतकऱ्यांना पावसाने दिलासा मिळाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांचा पाऊस राहणार असून वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहणार आहे.