Join us

Rain News Update : मराठवाडा, विदर्भाला पावसाने झोडपले; पूरस्थितीने हाहाकार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 10:23 AM

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (Rain News Update)

मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील जिल्ह्यांना सोमवारी (२ऑगस्ट) रोजी अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 

नदी-नाल्याकाठच्या गावांना फटका बसला, अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले. शेकडो गावांचा संपर्क तुटला, पिकांचाही चिखल झाला. नांदेड, परभणी व हिंगोलीमधील १६ प्रकल्पांमधून विसर्ग करण्यात येत असल्याने गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

विदर्भात यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, अकोला जिल्ह्यांतील शिवारं जलमय झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात एसडीआरएफचे पथक तैनात केले आहे.  जायकवाडी धरण ८८ टक्के भरले आहे.

या अतिवृष्टीत ४ लोकांना प्राण गमवावे लागले असून, १७ जण जखमी झाले आहेत. ८८ जनावरांचा मृत्यू झाला असून, १६० कच्च्या घरांची पडझाड झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पोळ्याच्या दिवशी बैल धुताना बुलढाणा जिल्ह्यात चौघांचा मृत्यू

प्रकाश सोळंके (वय ३५) व नीलेश बुलढाणा / मलकापूर ऐन पोळ्याच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा बुडून मृत्यू झाला. मलकापूर तालुक्यातील देवधाबा आणि हरणखेड येथे सोमवारी बैल धुताना नदीच्या पुरात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर दोघे थोडक्यात बचावले. 

हरणखेड येथेही एक जण बैल धुताना पाण्यात वाहून गेला. दरम्यान मोताळा तालुक्यातील रोहीणखेड आणि मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे मृत्यू झाला, पोळ्याच्या निमित्ताने बैल धुण्यासाठी देवधाबा येथील निंबाजी वसंत भोंबे (३०) खडका नदीत गेले होते. नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही वाहून गेले. 

त्याच ठिकाणी देवधाबा येथील प्रकाश काशिनाथ शिवदे (३२) बैल धुण्यासाठी गेले असता, पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडल्याने ते वाहून गेले. तब्बल तीन तासांनी त्यांचा मृतदेह सापडला, मलकापूर तालुक्यातीलच हरणखेड येथील रहिवासी गोपाळ प्रभाकर वांगेकर (वय २७) व्याघ्र नदीच्या पात्रात बैल धुण्यासाठी गेले असता, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.

आजचा अंदाज काय?

आज (३ सप्टेंबर) हवामान विभागाने संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव याशिवाय सातारा आणि पुणे जिल्ह्याला मंगळवारी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसविदर्भऔरंगाबादनांदेडहिंगोलीअकोला