Join us

Rain : राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस, शिवार भिजले, मराठवाड्यास दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 9:39 AM

राज्यातील बहुतेक भागात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने अनेक दिवसांना खंड भरून निघाला असून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 

नाशिकसह जळगाव जिल्ह्यात पावसाने (Rain) जोरदार पुनरागमन केले असून, गुरुवारी रात्री जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव व पारोळा या तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पारोळा तालुक्यात एकाच रात्री तब्बल ८३ मिमी. पाऊस झाला आहे. यासह भडगाव तालुक्यात ७५, तर अमळनेर तालुक्यात ६५ मिमी. पाऊस झाला आहे. पाचोरा व एरंडोल तालुक्यातही जोरदार पावसाने धुवून काढले आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात एकूण ४८ मिमी. पाऊस झाला होता, तर सप्टेंबर महिन्यात ६ व ७ सप्टेंबर रोजी एकूण ४९ मिमी पाऊस झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात एकाच रात्री एकूण ३६ मिमी. पाऊस झाला आहे. बुधवारी जिल्ह्यात १३ मिमी. पाऊस झाला होता. ६ व ७ सप्टेंबर या दोन दिवसात जिल्ह्यात ४९ मिमी. पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पावसाच्या सरासरीत ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात ७ सप्टेंबरपर्यंत एकूण ६२ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी चिंता दूर झाली असून, ज्या पावसाची गरज होती त्याप्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरीवर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. अजुनही प्रतिक्षा कायम आहे.

पश्चिम महाराष्ट्रात रिपरिपकोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, कागल तालुक्यात पावसाची भुरभुर होती. दुपारनंतर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. धरण क्षेत्रात पाऊस असला तरी त्याला जोर नव्हता. सांगली जिल्ह्यात हलक्या सरी पडल्या. इस्लामपूर, शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातही सरी पडल्या.सातारा जिल्ह्यात दहा दिवसांनतंर कोयना धरण क्षेत्रात पाऊस झाला. महाबळेश्वरला सर्वाधिक ४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. सोलापूर जिल्ह्यातही पाऊस झाला.

कोकणात दमदार पुनरागमनसिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. रलॉगिरी जिल्ह्यात दुपारपर्यंत संततधार सुरु होती

वार्षिक सरासरी ओलांडलीनांदेड जिल्ह्यात २४ तासात सरासरी १७.५० मिलिमीटर पाऊस झाला. बिलोली तालुक्यामध्ये आदमपूर मंडळामध्ये २४ तासात ६७.३० मिलिमीटर पाऊस झाला असून, प्रशासनाने अतिवृष्टीची नोंद घेतली आहे. हा पाऊस पिकांसाठी पोषक मानला जात असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात बिलोली, किनवट, माहूर, धर्माबाद आणि अर्धापूर या तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.

मराठवाड्याला तूर्तास दिलासा!लातूर जिल्ह्यात सर्वत्र २४ तासांत १३ मि.मी. पाऊस झाला आहे. यामुळे मांजरा प्रकल्पाची पाणीपातळी तीन सेंटिमीटरने वाढली आहे. परभणी, हिंगोली, बीड, जालना जिल्ह्यात गुरुवारपासून जिल्ह्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशीही रिमझिम पाऊस सुरुच होता. छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यातही जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातही दोन दिवस सर्वदूर पाऊस पडत असून विष्णुपुरी धरण ८४ टक्के भरले आहे.नाशिकच्या चार धरणांतून विसर्गाला सुरूवातनाशिक जिल्ह्यात शुक्रवारी अनेक भागात जोरदार पाऊस झाला. गोदावरी नदीत बस अडकल्याने बस पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील चार धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून ३०० क्यूसेक कडवा धरणातून १६९६ क्यूसेक, पालखेड धरणातून २००० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. गंगापूर धरणातूनही २०४० क्यूसेक विसर्ग सुरू असून गोदावरी नदीला नाशिक शहरात पूर आलेला आहे.

टॅग्स :पाऊसधरणमोसमी पाऊसहवामानशेतीपाणी