राज्यातील बहुतांश भागात कालपासून अवकाळी पावसाची जोरदार हजेरी असून नाशिकसह पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीटीचा तडाखा बसला. राज्यात बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आहे. रविवारी झालेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
Nashik : नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात भात शेतीचे मोठे नुकसान, ऐन काढणीच्या वेळी अवकाळीचा तडाखा
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड,येवला, सिन्नर या तालुक्यांना गारपीटीचा मोठा फटका बसला. पुणे शहरासह आंबेगाव परिसरात झालेल्या पावसाने काही ठिकाणी वाहतूकीचा खोळंबा झाला.नगरमधील पारनेरमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद, दौलताबाद, गंगापूर, लासूर स्टेशन, सिल्लोड, कन्नड, वैजापूर आणि पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.काही ठिकाणी गारपीट झाल्याचे सांगण्यात येत आहे.
धुळे, बुलढाणा जिल्ह्यात तूफान पाऊस
धुळे जिल्ह्यासह बुलढाण्यात काल रात्रीपासून तूफान पाऊस झाला. खरीप हंगामात काढणीला आलेली पिके पाण्यात भिजली आहेत.त्यामुळे पावसाचे मोठे नुकसान झाले आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा व लोणार तालुक्यात गारपीटीमुळे हरभरा, गहू, मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्यातही गारपीटीसह वादळी पाऊस झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस
रविवारी रात्रीपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पहाटे पावसाची संततधार होती. पावसामुळे वैजापूरमधील पिके जमिनदोस्त झाली आहेत.
Crop Damage : नाशिकच्या द्राक्ष पंढरीचा चिखल, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं!
नाशिकला गारपीट
नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारपासून वादळी पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटासह वादळी गारपीटीने जिल्ह्याला झोडपले. कांद्यासह द्राक्षफळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
"अवकाळी पावसानं सगळं उध्वस्त झालंय, घरात सगळे एकमेकांचे सुकलेले चेहरे पाहतायेत"
रब्बी पिकांसह फळबागा संकटात
जोरदार गारांसह पाऊस द्राक्ष बागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्वत्र गारा व पाऊस झाल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. झाडांची पाने व द्राक्ष घड़ तुटून जमीनदोस्त झाले असून द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.