Join us

Rain Update : सध्याचा पडणारा पाऊस विशिष्ट भागातच का पडतो आहे? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 2:12 PM

Maharashtra Rain : म्हणून तर हा पाऊस एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे सुके असते.

Maharashtra Rain : सूर्याच्या उष्णताऊर्जेने जमिनीचा पृष्ठभाग तापून जेंव्हा जमिनीने शोषलेले पाण्याचे बाष्पभवनातून, ऊबदार, अश्या दमट पाण्याच्या वाफेचे अवकाशात उरध्वगमन होवून, उंचावरील थंडाव्यातून, पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन घडते. व संवहनी क्रियेद्वारे मर्यादित क्षेत्रातच पाऊस (Heavy Rain) पडतो.                म्हणून तर हा पाऊस (Rain)  एखाद्या गाव, शहरात काही विशिष्ट भागात पाऊस पडतो. कुठे ओले तर कुठे सुके असते. समुद्रावरून अतिउंची गाठून, त्याच भू-भाग उंचीवर  मार्गस्थ झालेल्या संक्रमणित थंड बाष्पाशी, खालून जमिनीवरून उरध्वगामित झालेल्या दमट बाष्पाच्या संयोगातून ' क्यूमुलोनिंबस' प्रकारचे ढगनिर्मिती व त्यात  सांद्रीभवन घडून वीजासहित शक्यतो दुपारनंतर गडगडाटी पाऊस होतो. म्हणून तर ह्या पावसाला स्थानिक वातावरणीय दमट बाष्प ऊर्जेबरोबर अतिउंचावर संक्रमणित झालेल्या समुद्रीय ऊर्जेचाही अप्रत्यक्ष संबंध असतो.            साधारण पूर्वमोसमी हंगामातील मार्च ते मे तसेच परतीच्या पाऊस फिरू लागल्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर (उत्तरा, हस्त, चित्रा नक्षत्र ) महिने,  मान्सून आगमन व खंडा नंतरच्या काही दिवसातील पाऊस हा अश्या पद्धतीचा पाऊस असतो. ह्यालाच वळवाचा पाऊस म्हणतात.

शक्यतो दुपारनंतरच हा पाऊस होतो. सध्या गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात कमाल तापमानाची सरासरीपेक्षा जवळपास ५ ते ६ डिग्रीने झालेली लक्षणीय वाढ दुर्लक्षित करण्यासारखी नाही. त्यामुळेच वळवाचा पाऊस होत आहे.

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd )IMD Pune

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसनाशिकमहाराष्ट्र