Join us

Rain Update: मराठवाड्यात पडणार का जोरधार पाऊस? कुठल्या तालुक्यांनी पेरण्यांबाबत घ्यावी काळजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 9:21 AM

Marathwada Rain Update: मॉन्सूनचा पाऊस मराठवाड्यात कसा असेल? आज दिनांक २६ जूनसह पुढचे ५ दिवस कुठे पडणार सरासरीपेक्षा जास्त पाऊस?

Rain update for Marathwada प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात आज दिनांक 26 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 27 जून रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 28 जून रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 29 जून रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 28 जून 04 जूलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 30 जून ते 06 जुलै 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (परभणी जिल्हा : पूर्णा ; हिंगोली जिल्हा : वसमत, सेनगाव ; लातूर जिल्हा : जळकोट ; नांदेड जिल्हा : नांदेड, बिलोली, हतगाव, भोकर, देगलूर, हिमायतनगर, उमरी, नायगाव) शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. इतर तालूक्यात पेरणी करण्यास हरकत नाही. )

मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे.

टॅग्स :पाऊसमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज