Maharashtra Rain Updates : राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तर केवळ हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, आजच्या पावसाचा विचार केला तर हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आणि विदर्भातील केवळ एका जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात पावासाचा कोणताही इशारा देण्यात आला नाही. काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि विदर्भातील अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक, पालघर आणि नंदुरबार या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. वरील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून उर्वरित एकाही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता नाही.
काय आहेत अलर्ट?
रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि विदर्भातील अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.