Lokmat Agro >हवामान > Rain : चांगल्या पावसाची प्रतीक्षा 

Rain : चांगल्या पावसाची प्रतीक्षा 

Rain : Waiting for good rain  | Rain : चांगल्या पावसाची प्रतीक्षा 

Rain : चांगल्या पावसाची प्रतीक्षा 

Rain : सिंदफना मध्यम प्रकल्पात २३ टक्केच पाणीसाठा 

Rain : सिंदफना मध्यम प्रकल्पात २३ टक्केच पाणीसाठा 

शेअर :

Join us
Join usNext

Rain :  पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला. परंतू शिरूर कासार येथे तोलामोलाचा पाऊस पडत असल्याने शेतशिवार हिरवागार दिसत आहेत, असे असले तरी जलाशयाकडे पाहिल्यास मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अन्यथा भविष्यातील पाणी टंचाई चिंताजनकच असल्याचे सध्या चित्र दिसत आहे.
बीड अंतर्गत असलेल्या जलसिंचन क्रमांक एकच्या अहवालानुसार जलाशयातील पाण्याने मृत साठ्याचा उंबरठा ओलांडला नसल्याचे दिसून येते. एकमेव सिंदफना मध्यम प्रकल्पाला मोरजळवाडी व पिंपळवंडी तलावाचा आधार मिळाल्याने २३ टक्क्यांपर्यंत साठा झाला आहे.

जून व जुलै या दोन महिन्यात सतत पावसाने हजेरी लावली. त्या आधारे पिकाने बहरलेली हिरवीगार सृष्टी दिसत असली तरी नद्या, ओढे, नाले यासह जलाशयाची सद्य परिस्थिती मात्र समाधानावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दोन महिन्यात अजूनही जलाशयाने मृत साठ्याचा टप्पा ओलांडला नाही.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसात वाढ झाली असली तरी मात्र नद्या तलाव अद्यापपर्यंत तहानलेलेच आहेत. गेल्यावर्षी जून ते आजपर्यंत फक्त ४४ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी तो ७५.७ टक्केपर्यंत गेल्याचा अहवाल सांगतो. पावसाळ्याच्या उरलेल्या दिवसात तरी चांगल्या पावसाची हजेरी लागावी, अशी अपेक्षा या तालुक्यातील नागरिक करीत आहेत.

जलाशय भरले तर सिंचनाला फायदा
शिरूर तालुक्यातील मोरजळवाडी व पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी तलाव पूर्ण भरले असून त्यातून आलेल्या पाण्याने सिंदफना धरणाला आधार देण्याचे काम केले आहे. 

आकडेच सांगतात जलाशय कोरडे

जलाशय                                           पाणी साठा 
सिंदफना मध्यम प्रकल्प                        २३ टक्के, 
उथळा मध्यम प्रकल्प                            ०.१३ टक्के, 
नारायणगड तलाव                                ०.९८ टक्के, 
निमगाव                                                १०.४९ टक्के, 
फुलसांगवी                                            १३.१२ टक्के, 
हिवरसिंगा                                             ०.१४ टक्के, 
खोकरमोह                                             ०.१४ टक्के,
खराबवाडी तलावात                               ०.९८ टक्के 

पाणीसाठा असल्याचे अहवाल सांगतो. 

मोठा पाऊस येणे आवश्यक  


आता मोठा पाऊस येणे अत्यंत गरजेचे आहे. जर जलाशय पूर्ण क्षमतेने भरले तर पुढे सिंचनासाठी फायदेशीर ठरेल. 
- अविनाश मिसाळ, शाखा अभियंता

Web Title: Rain : Waiting for good rain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.