Join us

ऑगस्टमध्ये पाऊस कमीच राहणार हवामान विभागाचा अंदाज : महापूर येण्याची शक्यता धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2023 1:40 PM

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर तसा कमीच राहणार आहे. महिनाभरात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणार असल्याने महापुराची शक्यता धूसर असल्याचा ...

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर तसा कमीच राहणार आहे. महिनाभरात सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणार असल्याने महापुराची शक्यता धूसर असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.

यंदा जून महिना कोरडा गेल्याने कमी असून उघडझाप सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरत महिन्यात बऱ्यापैकी पावसाने हजेरी आल्याने ऑगस्टमध्ये पाऊस वाढला लावली. १५ जुलैनंतर पावसाचा जोरवाढत गेला आणि धरणातील पाणीसाठाही वाढला.  तर महापुराचे संकट येऊ शकते, अशी वाढत गेला आणि धरणातील पाणी भीती नागरिकांना आहे. यापूर्वी २०१९ साठाही वाढला. बहुतांशी धरणातील व २०२१ ला धरणे तुडुंब झाल्यानंतर पाणीसाठा ८० टक्क्यांच्या पुढे आहे. महापुराचे संकट ओढवले होते.तसेच संकट यावर्षी येऊ शकेल अशी भीती आहे. मात्र, हवामानाचे युरोपियन मॉडेल व इतर जागतिक मॉडेल्स तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे जारी केलेल्या ऑगस्ट महिन्याच्या एकंदरीत हवामान अंदाजाप्रमाणे या महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस कमीच राहण्याचा अंदाज आहे.

 "हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये पाऊस कमी राहणार आहे. बापैकी उघडीप राहणार असल्याने महापुराचा धोका नाही."-राहुल पाटील, मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान, सांगली