Join us

पावसाळी वातावरण राहणार फक्त दोनच दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 9:34 PM

संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता

आज व उद्या (मंगळवार व बुधवार) दि.९ व १० जानेवारी, फक्त दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. भूर-भुऱ्या (ड्रीझल) टाईप पावसाची शक्यता ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी सह पुणे, सातारा, नगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नगर तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, जिल्ह्यात अधिक असू शकते. उर्वरित विदर्भात पावसाची शक्यता जाणवत नाही.

कशामुळे हा पाऊस? साक्री व दापोली शहर अक्षवृत्त व पोरबंदर शहर रेखावृत्त दरम्यान, अरबी समुद्रात, समुद्र पाण्याच्या पृष्ठभागापासून वर उंच दिड किमी. पर्यन्त पसरलेल्या हवेच्या कमी दाबाच्या आसामुळे खेचलेल्या पुरवी झोताचे दमट व उत्तरी दिशेकडून थंड वारे ह्यांच्या संयोगातून सध्या महाराष्ट्रात दोन दिवस पावसाळी वातावरण घडून आले. बुधवार दि.११ जानेवारीपासून पावसाळी वातावरण निवळून हळूहळू किमान तापमानात घसरण होवून थंडीला सुरवात होवु शकते. 

- माणिकराव खुळे (Meteorologist Retd. IMD Pune)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीहवामान