Lokmat Agro >हवामान > चांदोली परिसरात अतिवृष्टी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ

चांदोली परिसरात अतिवृष्टी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ

Rapid increase in the water storage of the flood dam in Chandoli area | चांदोली परिसरात अतिवृष्टी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ

चांदोली परिसरात अतिवृष्टी धरणाच्या पाणी साठ्यामध्ये झपाट्याने वाढ

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेली पाच दिवसात दमदार हजेरी लावली आहे. धरणामध्ये गतवर्षी पेक्षा १.०६ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेली पाच दिवसात दमदार हजेरी लावली आहे. धरणामध्ये गतवर्षी पेक्षा १.०६ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे.

शेअर :

Join us
Join usNext

चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गेली पाच दिवसात दमदार हजेरी लावली आहे. धरणामध्ये गतवर्षी पेक्षा १.०६ टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. सध्या धरणात एकूण १२.२० टीएमसी तर ५.३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

गतवर्षी यादिवशी एकूण पाणीसाठा १०.८८ टीएमसी होता. गतवर्षीपेक्षा ४१७ मिलिमीटर पाऊसही जादा पडला आहे. धरण परिसर, पाथरपुंज, निवळे, चरण येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे. वारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे.

चांदोली धरणातून ६७५ क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणामध्ये ४७५० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात पाथरपुंज येथे ६७, निवळे येथे ८०, चांदोली धरण परिसरात ८३, तर चरण येथे ८३.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. पाथरपुंज येथे आजअखेर १ हजार २५५ मिलिमीटर तर दाजीपूर-राधानगरी येथे १ हजार ३३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवारी तालुक्यात लहान मोठ्या सरी पडल्या. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. चांदोली धरण परिसरात १ जूनपासून ५९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस (मिमी)
चांदोली धरण ८३ (५९५)
पाथरपुंज ६७ (१२५५)
निवळे ८० (१०५९)
धनगरवाडा ५६ (५६९)

पाथरपुंज येथे सहाव्यांदा अतिवृष्टी
पाथरपुंज येथे दि. ११ जून ६९ मिलिमीटर, दि. २१ रोजी १३३ मिलिमीटर, दि.२३ जून रोजी १७६, दि. २६ रोजी ८६ मिलिमीटर, दि. २९ रोजी ७९ मिलिमीटर, तर दि. २ जुलै ६७ मिलिमीटर अशी सहा वेळा अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Web Title: Rapid increase in the water storage of the flood dam in Chandoli area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.