Lokmat Agro >हवामान > निरा खोऱ्यातील धरणांत झाला किती पाणीसाठा? वाचा सविस्तर

निरा खोऱ्यातील धरणांत झाला किती पाणीसाठा? वाचा सविस्तर

Read more about how much water is stored in the dams in Nira Valley | निरा खोऱ्यातील धरणांत झाला किती पाणीसाठा? वाचा सविस्तर

निरा खोऱ्यातील धरणांत झाला किती पाणीसाठा? वाचा सविस्तर

निरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. भाटघर, वीर, निरा देवघर व गुंजवणी धरणात दि. ३१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे निरा खोऱ्यातील धरणांमध्ये ८९ टक्के पाणीसाठा झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

निरा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. भाटघर, वीर, निरा देवघर व गुंजवणी धरणात दि. ३१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे निरा खोऱ्यातील धरणांमध्ये ८९ टक्के पाणीसाठा झाला आहे.

चारही धरणांत मिळून ८९.६५ टक्के पाणीसाठा झाला असून, मागील वर्षी हा पाणीसाठा ७४.८२ टक्के इतका होता. चार धरणांत एकूण ४३.३ टीएमसी पाणीसाठा असून, मागील वर्षी ३६.१ टीएमसी इतका पाणीसाठा होता.

गतवर्षी ३१ जुलै २०२३ रोजी या चार धरणांतील एकूण पाणीसाठा ३६.१५८ टीएमसी व टक्केवारीत ७४.८२ टक्के एवढा होता. तर ३१ जुलै २०२४ रोजी याच चार धरणांतील एकूण पाणीसाठा ४३.३२८ टीएमसी व ८९.६५ टक्के एवढा आहे.

वीर धरणातून निरा नदीपात्रात ३१ जुलै रोजी सकाळी ६ वाजता १५,१६१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तर वीर धरणातून निरा उजवा कालव्यासाठी ११०१ तर डाव्या कालव्यासाठी ६५० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

धरणांमधील पाण्याची स्थिती
■ गुंजवणी : पाणलोट क्षेत्रात ७० मि.मी., एकूण १७०२ मि.मी. पाऊस, ७७.०७ टक्के पाणीसाठा.
■ भाटघर : पाणलोट क्षेत्रात १९ मि.मी., एकूण ६७१ मि.मी. पाऊस, ९४.२६ टक्के पाणीसाठा.
■ निरा-देवघर : पाणलोट क्षेत्रात ६३ मि.मी., एकूण १०८ मि.मी. पाऊस, ८७.३६ टक्के पाणीसाठा.
■ वीर : पाणलोट क्षेत्रात १ मि.मी., एकूण २६१ मि.मी. पाऊस, ९३.२० टक्के पाणीसाठा.

Web Title: Read more about how much water is stored in the dams in Nira Valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.