Join us

Ujani Dam उजनीतून सहा हजार क्युसेक पाणी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 10:56 AM

सोलापूर भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाच्या गाळ मौऱ्यातून शुक्रवारी दुपारी साडेचारपासून सहा हजार क्यूसेक क्षमतेने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

सोलापूर भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाच्या गाळ मौऱ्यातून शुक्रवारी दुपारी साडेचारपासून सहा हजार क्यूसेक क्षमतेने भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

सोलापूरकरांसाठी ही आनंदाची बाब असली तरी आधीच वजा ४५ टक्के पाणी उरलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा वजा ६० टक्क्यांपर्यंत खालावला जाण्याची शक्यता आहे.

पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद पिण्याच्या पाणी योजना आणि भीमा नदीवरील इतर गाते व शहरे यांना पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, सोलापूर शहर, भीमा नदीकाठची शहरे व गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी हे पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरणाच्या चार गाळ मोऱ्यांतून हे पाणी सोडण्यात आले आहे.

यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिली, उजनी धरणातून उपलब्ध झालेले पाणी सोलापूर शहराला पुढील पन्नास दिवस काटकसरीने पुरवावे लागणार आहे.

सुरुवातीला १२:३० वाजता २५०० क्युसेकचा विसर्ग होता, त्यानंतर अडीच वाजता ४५०० करण्यात आला. सायंकाळी साडेचारनंतर ६ हजार क्युसेकचा विसर्ग केला.

२० मे पर्यंत पोहोचणार औज अन् चिंचपूर बंधाऱ्यातएकंदर साडेपाच टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. २० मे पर्यंत हे पाणी सोलापूर शहराला पाणीपुरवठा व करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी पोहोचणे अपेक्षित आहे. मात्र, भीषण पाणीटंचाई, जागोजाग कोरडे पडलेले भीमा नदीचे पात्र यामुळे तीव्र उन्हाळा जमिनीत किती पाणी मुरेल, किती पाण्याचे बाष्पीभवन होईल यावर पाण्याच्या प्रवासाचा कालावधी अवलंबून असणार आहे.

असा वाढला विसर्ग■ दिवस - १० मे २०२४■ दुपारी १२:३० वाजता २५०० क्युसेक■ दुपारी २:३० वाजता ३००० क्युसेक■ सायंकाळी ४:३० वाजता ६००० क्युसेक

धरणातील पाणीपातळी• उजनी मायनस ४४.६९%• औज बंधारा ५०%• हिप्परगा तलाव ३५%• चिंचपूर ४०%

अधिक वाचा: Nira Deoghar Dam निरादेवघर धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा

टॅग्स :उजनी धरणधरणपाणीसोलापूरपंढरपूरनदी