Lokmat Agro >हवामान > Remal Cyclone:'रेमल' प. बंगालमध्ये धडकले, महाराष्ट्रातील अनेक शहरांत मुसळधार पावसाची हजेरी

Remal Cyclone:'रेमल' प. बंगालमध्ये धडकले, महाराष्ट्रातील अनेक शहरांत मुसळधार पावसाची हजेरी

Remal Cyclone: 'Remal' W. Bengal lashed, heavy rains in many cities of Maharashtra | Remal Cyclone:'रेमल' प. बंगालमध्ये धडकले, महाराष्ट्रातील अनेक शहरांत मुसळधार पावसाची हजेरी

Remal Cyclone:'रेमल' प. बंगालमध्ये धडकले, महाराष्ट्रातील अनेक शहरांत मुसळधार पावसाची हजेरी

effect of remal cyclone on monsoon, २०२० साली आलेल्या चक्रीवादळ अम्फानपेक्षा रेमलमुळे कमी नुकसान होईल.

effect of remal cyclone on monsoon, २०२० साली आलेल्या चक्रीवादळ अम्फानपेक्षा रेमलमुळे कमी नुकसान होईल.

शेअर :

Join us
Join usNext

तीव्र चक्रीवादळ 'रेमल'  (remal cyclone) रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर भागावर अंदाजे ११०- १२० किमी प्रतितास वेगाने धडकले. चक्रीवादळामुळे किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच राजधानी कोलकाता आणि त्याच्या लगतच्याही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभागाचे माजी क्षेत्रीय प्रमुख सोमनाथ दत्ता यांनी सांगितले की, २०२० साली आलेल्या चक्रीवादळ अम्फानपेक्षा रेमलमुळे कमी नुकसान होईल.

पारा ४६ पार; जळगाव, अकोल्यात कलम १४४

जळगाव/अकोला/नागपूर : राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा पारा ४५ पार झाल्याने जळगाव आणि अकोला जिल्ह्यांत ३१ मेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून काढण्यात आले आहेत. उन्हासाठी अशाप्रकारची प्रतिबंधात्मक उपाययोजना होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.

यवतमाळमध्ये पारा ४६.६ अंशावर

यवतमाळमध्ये पारा ४६.६ अंशावर उसळला असून, ही ३५ वर्षापूर्वीच्या विक्रमाची बरोबरी आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील सोनोरी येथील शेख अश्फाक शेख भुरू (३८) यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी आढळला. त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समजते.

एक लाखाहून अधिक लोक स्थलांतरित 

खबरदारीचा उपाय म्हणून, बंगाल सरकारने सुंदरबन आणि सागर बेटांसह किनारपट्टी भागातील सुमारे १ लाखाहून अधिक लोकांना सुरक्षित आश्रयस्थानी हलवले आहे.

Web Title: Remal Cyclone: 'Remal' W. Bengal lashed, heavy rains in many cities of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.