आकाशात मे महिन्यात होणार दिवाळी; आपल्याकडे दिसेल? ४-६ मे दरम्यान उल्कापाताचा नजारा; नंतर थेट २०४६ मध्ये संधी; थेट पृथ्वीवर पडण्याची भीती नाही
या आठवड्यात आकाशात डोळे दिपवणारी आतषबाजी पाहायला मिळणार आहे. दरवर्षी १९ एप्रिल ते २८ मे दरम्यान उल्कावर्षाव होत असला तरी दोन दशकांच्या खंडानंतर या उल्कावर्षावासारखे अनोखे दृश्य पाहायला मिळणार आहे.
उल्कांचा पाऊस सुरू झाला असून ४ ते ६ मे दरम्यान ते शिखरावर असेल, असे अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'ने सांगितले. याचा नजारा दक्षिण गोलार्धात दिसणार आहे.
या दरम्यान ७,५७,३४४ उल्कांचा वेग किलोमीटर प्रतितास असेल.
उल्कावर्षाव म्हणजे काय?
■ उल्कावर्षाव अशा खगोलीय घटना आहेत ज्या रात्रीच्या आकाशात अनेकदा दिसतात. या उल्का विश्वात मुक्तपणे संचार करणाऱ्या भटकत्या ताऱ्यांमुळे तयार होतात. त्या अतिशय वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात.
■ बहुतांश उल्का वाळूच्या कणापेक्षा लहान असतात, त्यामुळे त्या सर्व हवेतच वितळतात. उल्का पृथ्वीच्या पृष्ठभागावर केवळ अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत आदळतात.
थेट डोळ्यांनी पाहा उल्कापात
■ हा उल्कापात हॅलीच्या धूमकेतूशी संबंधित आहे. त्याला 'एटा एक्वेरिड्स' म्हणतात. ४ मे ते ६ मे दरम्यान दर मिनिटाला आकाशात उल्कावर्षाव होणार आहे. तो अत्यंत तेजस्वी असल्यामुळे पृथ्वीवरूनही तो थेट डोळ्यांनी पाहता येईल.
■ 'एटा एक्चेरिड्स'चा पुढील उदेक २ २०४६ मध्ये होईल. या उल्कावर्षावात दिसणाऱ्या उल्का शेकडो वर्षांपूर्वी हॅलेच्या धूमकेतूपासून वेगळे झाले होते. सुदैवाने या धूमकेतूची कक्षा पृथ्वीपासून पुरेशी लांब आहे आणि त्यामुळे उल्का पृथ्वीवर पडू शकत नाही.