Join us

Ujani Dam: दौंड येथून सात हजार क्युसेक, उजनीची पाणी पातळी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:00 AM

भीमा खोऱ्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मंगळवारी सकाळी झालेली वाढ सायंकाळी कमी झाली होती. सकाळी ६ वाजता ७ हजार ८४४ क्युसेक होता.

टेंभुर्णी: भीमा खोऱ्यात गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मंगळवारी सकाळी झालेली वाढ सायंकाळी कमी झाली होती. सकाळी ६ वाजता ७ हजार ८४४ क्युसेक होता. सायंकाळी ६ वाजता त्यात ६ हजार ७८० क्युसेक विसर्ग चालू होता.

१ हजार क्युसेकने विसर्ग कमी झाला आहे. गेल्या महिन्यापासून दौंड विसर्ग सुरू झाला होता. कमी अधिक प्रमाणात का होईना असून दौंड विसर्ग सातत्याने सुरू आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता ५ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. सध्या उजनी धरणाचीपाणी पातळी गतवर्षी एवढी सायंकाळ झाली होती.

मंगळवारी त्यात वाढ झाली होती. पाऊस थांबल्याने सायंकाळी दौंड विसर्गात घट झाली. गेल्या ३३ दिवसांत २२ टक्के उजनी धरणाचीपाणी पातळी वाढली आहे. ५९.९९ टक्के यावर्षी पाणी पातळी खालावली होती. तर ३१.५२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. सध्या उजनी धरणात ४३.६४ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

एक महिन्यात १२.१२ टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. या हंगामात १० जूनला दौंड येथून ७ हजार ९५४ क्युसेक हा सर्वाधिक विसर्ग सुरू होता. त्यानंतर महिनाभराने पुन्हा वाढ होऊन ७ हजार ८४४ वर पोहोचला होता.

मात्र, पुन्हा १२ तासांत दौंड विसर्गात घट झाली. त्यामुळे उजनी पाणी पातळीत हळूहळू वाढ होत आहे. गतवर्षी ९ जुलै २३ रोजी उजनी धरणाची पाणी पातळी वजा ३६.१९ टक्के होती. ती सर्वाधिक पाणी पातळी होती.

मंगळवारी (दि.९) सायंकाळी ६ वाजता वजा ३७.१७ टक्के पाणी पातळी झाली होती. तर ४४.२७ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षी पेक्षा उजनी धरणाची पाणी पातळी यावर्षी २३.८ टक्के जास्त खालावली होती. मात्र, यावर्षी पाऊस लवकर सुरू झाल्याने १० जुलैला गतवर्षीसारखीच उजनी धरणाची पाणी पातळी एकसमान झाली.

टॅग्स :उजनी धरणपाणीधरणसोलापूरदौंडशेती