Lokmat Agro >हवामान > bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या

Severe water crisis in Bengaluru: What is the status of dams water storage in Maharashtra? | bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीसंकट; महाराष्ट्रात काय आहे धरणांची स्थिती? जाणून घ्या

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील धरणांची काय स्थिती आहे? ते जाणून घेऊ.

bengaluru water crisis: बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंडाची कारवाई होत आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील धरणांची काय स्थिती आहे? ते जाणून घेऊ.

शेअर :

Join us
Join usNext

बंगलुरू शहरात यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सुमारे १५ लाख कर्मचाऱ्यांनकडून ‘घरून काम’ करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे लोक आपल्या गावी जातील आणि शहरावरील पाणी टंचाईचा ताण कमी होईल, अशी अटकळ आहे.

बंगलुरू शहरातील लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. यंदा १८ टक्के पाऊस कमी पडल्याने शहराला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांची पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महाराष्ट्रातील धरणसाठा
उशिराने आलेला मॉन्सून आणि ऑगस्ट २३ मध्ये सुमारे २१ दिवसांचा झालेला पावसाचा खंड यामुळे महाराष्ट्र राज्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मागच्या वर्षाच्या तुलनेने कमी पाणीसाठा असल्याचे चित्र जलसंधारण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.

मागच्या वर्षी २५ मार्च २३ रोजी राज्यातील धरणांमध्ये  ५७.४७ % पाणीसाठा होता. यंदा २३ मार्च २४ रोजी हाच एकूण पाणीसाठा ४०.१८ टक्कयांवर आला आहे.

कुठल्या विभागात किती पाणीसाठा
नागपूर : ५०.२%
अमरावती: ४६.९४%
संभाजीनगर: २३.१९%
नाशिक: ४१.८७% 
पुणे: ४०.४३%%
कोकण: ४६.७२%

Web Title: Severe water crisis in Bengaluru: What is the status of dams water storage in Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.