बंगलुरू शहरात यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असून आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सुमारे १५ लाख कर्मचाऱ्यांनकडून ‘घरून काम’ करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हे लोक आपल्या गावी जातील आणि शहरावरील पाणी टंचाईचा ताण कमी होईल, अशी अटकळ आहे.
बंगलुरू शहरातील लोकसंख्या दीड कोटीवर पोहोचली आहे. यंदा १८ टक्के पाऊस कमी पडल्याने शहराला पाणी पुरवणाऱ्या जलाशयांची पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महाराष्ट्रातील धरणसाठाउशिराने आलेला मॉन्सून आणि ऑगस्ट २३ मध्ये सुमारे २१ दिवसांचा झालेला पावसाचा खंड यामुळे महाराष्ट्र राज्यात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मागच्या वर्षाच्या तुलनेने कमी पाणीसाठा असल्याचे चित्र जलसंधारण विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.
मागच्या वर्षी २५ मार्च २३ रोजी राज्यातील धरणांमध्ये ५७.४७ % पाणीसाठा होता. यंदा २३ मार्च २४ रोजी हाच एकूण पाणीसाठा ४०.१८ टक्कयांवर आला आहे.
कुठल्या विभागात किती पाणीसाठानागपूर : ५०.२%अमरावती: ४६.९४%संभाजीनगर: २३.१९%नाशिक: ४१.८७% पुणे: ४०.४३%%कोकण: ४६.७२%