राज्यात मागील दोन ते तीन दिवस सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून विसर्ग सुरू होता. त्यामुळे नाशिक शहरात गोदावरीला पूर आला, तर नगर जिल्ह्यातील निळवंडे आणि भंडारदरा धरणक्षेत्रातील पावसामुळे प्रवरा नदीतही विसर्ग सुरू होता. त्यामुळे हे सर्व पाणी जायकवाडीला येऊन मिळाले.
आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'
राज्याच्या जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांनी केलेल्या माहितीसंकलनानुसार दिनांक १ जून पासून आज ११ सप्टेंबरपर्यंत जायकवाडी धरणात एकूण १०.७६० टीएमसी अंदाजे पाणीसाठा झाला आहे. मागच्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात तब्बल १.१२९९ टीएमसी पाणी आल्याचा अंदाज व्यक्त होताना दिसत आहे. दरम्यान जायकवाडी धरण आजपावेतो ५०.९६ टक्के इतके भरले आहे.
Rain : अनेक धरणक्षेत्रात पावसाची उघडीप; असा आहे राज्यातील धरण पाणीसाठा व विसर्ग
दरम्यान घाटघर, रतनवाडी, भंडारदरा, पांजरे, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, कोयना, नवजा धरणक्षेत्रात आज सकाळपर्यंत हलका पाऊस झाला. मात्र राज्यातील इतर धरणक्षेत्रातील पाऊस आता थांबला असून अनेक धरणांतून होणारा विसर्गही थांबविण्यात आलेला आहे. भंडारदरा, निळवंडे, राधानगरी, हतनूर यासारख्या धरणांमधून विसर्ग सुरू आहे.
नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीस किती पाणी येणार?
मराठवाडा विभागातील धरणांचा पाणी साठा असा आहेजायकवाडी धरणएकुण--५२.३५८७ टीएमसी/५०.९६%उपयुक्त- २६.२८४६ टीएमसी/३४.२८%येलदरी- १७.५१३ टीएमसी/६१.२४%माजलगाव--१.३८४ टीएमसी/१२.५६%पेनगंगा(ईसापुर)--(उ)--२४.१६० टीएमसी/७०.९६%तेरणा--उ)---०.८३५ टीएमसी/२५.९२%मांजरा(उ)----१.५४५ टीएमसी/२४.७८%दुधना----(उ)--२.२०८ टीएमसी/२५.८१%विष्णुपुरी-(उ)--२.४६९ टीएमसी/८६.५३%