नैऋत्य मोसमी पावसाने आज संपूर्ण देशातून माघार घेतल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले. कमी दाबाचा पटटा अरबी समुद्राच्या आता अग्नेय- नैऋत्य भागात सक्रीय आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून तेज चक्रीवादळ धडकण्याची चिन्हे आहेत.
राज्यात मान्सूनने कधीच माघार घेतली असून बहूतांश भागात तापमान वाढत आहे. मागील दोन ते तीन दिवसात मराठवाडा, विदर्भ, खान्देशात हवामान कोरडे होते. कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस झाला.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकणात सामान्य तापमानाच्या तुलनेत आज अधिक तापमानाची नोंद झाली. दरम्यान, बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून २३ ऑक्टोबर पर्यंत हा पट्टा सक्रीय राहणार आहे. यावेळी हवेचा वेग ३५ ते ४५ किमी प्रतितास राहणार असून चक्रीवादळाच्या दरम्यान हा वेग वाढण्याची शक्यता आहे.