हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या अंदाजानुसार देशभरात येत्या दोन महिन्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. त्यानुसार काल जाहिर करण्यात आलेल्या हवामान अहवालानुसार पुढील पाच दिवसात कर्नाटक, ओडिशाच्या काही भागांपासून उष्णतेच्या लाटांना सुरुवात होणार असून आंध्र प्रदेशातही उष्ण तापमानाची लाट असेल.
दरम्यान, राज्यात तापमानाचा पारा ४० ते ४३ अंशांपर्यंत जात असताना बहुतांश टिकाणी सामान्य तापमानाच्या तूलनेत १ ते ४ अंशांनी तापमान वाढले आहे. काल राज्यात सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सियस तापमान वर्ध्यात नोंदवले गेले. हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या हवामान अंदाजानुसार देशभरात पुढील दोन महिने उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात कर्नाटक व ओडिशाच्या काही भागात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.
दरम्यान काल कमाल तापमानात देशभरात सर्वाधिक वाढ झाल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी उत्तर ओडिशासह मराठवाडा, विदर्भासह कर्नाटक, मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी ३ एप्रिल रोजी तापमान नेहमीपेक्षा ९५ टक्के अधिक होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भ व कोकणात काल तापमान सामान्या तापमानाच्या तूलनेत अधिक असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले.
उष्माघातापासून वाचण्यासाठी हे करा
गेल्या काही दिवसांपासून सतत तापमानात वाढ होऊ लागल्याने उन्हाच्या झळा बसत आहेत. यामुळे अनेकांना थकवा आणि उष्माघाताचा त्रास जाणवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या उपचाराची सोय झाली आहे. उष्माघातापासून वाचण्यासाठी हे करावे..
■ फळे व सलाडसारखे पचायला हलके पदार्थ खावेत.■ ताक, लिंबूपाणी, लस्सी, ओआरएस असे द्रावण घ्यावे.■ भरपूर पाणी प्यावे.■ सैल, हलके, फिक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावे.■ गॉगल, छत्री, टोपी, बूट, चप्पल घालूनच बाहेर पडावे.■ दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे.■ प्रवास करताना पाण्याची बाटली जवळ बाळगावी.
संबंधित वृत्त-
वाढत्या उन्हामुळे.. ही दिसतायत लक्षणे? काय घ्याल खबरदारी
किकुलॉजी: सावधान! यंदा एप्रिल आणि मे महिना असणार आहे ‘हॉट’, कारण...
Heat Wave उन्हाळा तीव्र होतोय; काय करावे व काय करू नये?
तापमानाच्या अशाच अपडेट्ससाठी फॉलो करा लोकमत ॲग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रूपला