Join us

राज्याचा धरणसाठा ३५ टक्क्यांवर, कोणत्या विभागात किती पाणी उरलंय?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 08, 2024 9:10 AM

छत्रपती संभाजीनगर विभागात राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा...

राज्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर रुप घेताना दिसत असून वाढत्या तापमानासह धरणातीलपाणीसाठा वेगाने घटत आहे. जलसंपदा विभागाने जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्याच्या मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये आज ३५.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

राज्यातील एकूण धरणसाठ्यात आता १४ हजार ५२७ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात राज्यातील सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक असून  आज दि ८ एप्रिल रोजी १८.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा ४४.६८ एवढा होता.

नाशिक व पुणे विभागातील पाणीसाठाही वेगाने कमी होत आहे. नाशिकच्या लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये आता ३६.९१ टक्के पाणी शिल्लक असून पुणे विभागातील ७२० धरणांमध्ये ३४.१७ टक्के पाणीसाठा उरला आहे. परिणामी, नागरिकांना येत्या काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

विभाग

२०२४

२०२३

औरंगाबाद

18.31 %

44.68 %

नाशिक

36.91 %

50.84 %

पुणे

34.17 %

45.21 %

नागपूर

47.54 %

28.78 %

अमरावती

47.88 %

47.19 %

कोकण

48.98 %

51.10 %

जायकवाडी धरणात १८.७६ टक्के

छत्रपती संभाजीनगर विभागात राज्यातील सर्वात कमी पाणी शिल्लक आहे. दरम्यान मराठवाड्याच्या हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात १८.७६ टक्के पाणी शिल्लक आहे. 

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाई