Lokmat Agro >हवामान > समुद्रावरून बाष्पयुक्त वारं येतंय आणि चढतोय पारा

समुद्रावरून बाष्पयुक्त वारं येतंय आणि चढतोय पारा

Steamy winds are coming in from the sea and the temperature is rising | समुद्रावरून बाष्पयुक्त वारं येतंय आणि चढतोय पारा

समुद्रावरून बाष्पयुक्त वारं येतंय आणि चढतोय पारा

गेल्या १३ वर्षांमधील पुण्यातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान २८ एप्रिल २०१९ मध्ये नोंदविले गेले होते. तेव्हा ४३ अंशांवर तापमानाचा पारा होता. यंदा एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा हा ३९ अंशांवर आहे.

गेल्या १३ वर्षांमधील पुण्यातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान २८ एप्रिल २०१९ मध्ये नोंदविले गेले होते. तेव्हा ४३ अंशांवर तापमानाचा पारा होता. यंदा एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा हा ३९ अंशांवर आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : गेल्या १३ वर्षांमधील पुण्यातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान २८ एप्रिल २०१९ मध्ये नोंदविले गेले होते. तेव्हा ४३ अंशांवर तापमानाचा पारा होता. यंदा एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा हा ३९ अंशांवर आहे.

यामध्ये थोडी-फार वाढ होण्याची शक्यता असून, मे अखेरपर्यंत कदाचित ४३ अंशांपर्यंत कमाल तापमान जाऊ शकते, असा अंदाज 'आयएमडी'चे माजी प्रमुख व ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केला.

राज्यातील किमान व कमाल तापमान वाढताना दिसून येत आहे. गेल्या २०१३ पासून पुण्यात एप्रिल महिन्यामध्ये सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

यंदा तरी अजून शिवाजीनगर येथील तापमान ४० अंशांवर गेले नाही. परंतु, मे अखेरपर्यंत चाळिशीपार जाऊ शकते, असा अंदाज आहे. यंदा पुण्यात दमट वातावरण अधिक असल्याचे
अनुभवायला येत आहे.

एप्रिल महिन्यातील कमाल तापमान

२०१३ ४१.३
२०१४ ४०.७
२०१५४०.०
२०१६४०.९
२०१७४०.८
२०१८४०.४
२०१९४३.०
२०२०४०.१
२०२१३९.६
२०२२४१.८
२०२३४०.०
२०२४३९.८

अरबी समुद्रातून आर्द्रतायुक्त वारे गुजरातमार्गे महाराष्ट्र आणि पुण्याकडे वाहत आहेत, त्यामुळे शहराला सध्या दमट वातावरणाचा अनुभव येत आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले तरी डिहायड्रेड होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. पुण्यात सध्या तरी उष्णतेची लाट नाही. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ व माजी
आयएमडी प्रमुख

Web Title: Steamy winds are coming in from the sea and the temperature is rising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.