अरबी समुद्राच्या आग्नेय आणि नैर्ऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, तो २१ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवारी सांगितले. अरबी समुद्रातील या वर्षातील हे दुसरे चक्रीवादळ असेल, हिंद महासागरातील चक्रीवादळांच्या नावासाठी स्वीकारलेल्या सूत्रानुसार त्याला 'तेज' असे संबोधण्यात येईल. ते रविवारी तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊन ओमानची दक्षिणेकडील किनारपट्टी व जवळील येमेनकडे सरकण्याची अपेक्षा आहे.
'स्कायमेट वेदर' या खाजगी हवामान अंदाज संस्थेने म्हटले की, बहुतेक मॉडेल्स वादळ येमेन - ओमान किनारपट्टीकडे सरकत असल्याचे सूचित करतात. जागतिक अंदाज प्रणाली मॉडेल्सनुसार ते पाकिस्तान व गजरात किनारपदीकडे जाऊ शकते.