Join us

Temperature: जळगावात १०.४ अंश, राज्यात आज कसे होते तापमान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 21, 2023 8:05 PM

जळगाव, उद्गीरमध्ये १०.४ अंश एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.

राज्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. मागील चार दिवसांच्या तूलनेत चढ उतार होत असले तरी गारठा वाढला आहे. उत्तरेतील राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून किमान तापमान ४ ते ८ अंशापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान, राज्यात जळगाव, उद्गीरमध्ये १०.४ अंश एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.

बहुतांश राज्यात तापमानात घट झाल्याचे चित्र आहे. अनेक भागात रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटल्या आहेत.गारठ्याने राज्य गारठले आहे. किमान तापमानात ही घट असली तरी कमाल तापमानात चढ उतार दिसून येत आहेत. सामान्य तापमानाच्या तूलनेत हे तापमान १ ते २ अंशांने अधिक असल्याचे हवामान विभागाच्या दैनंदिन अहवालावरून दिसून येत आहे.

मराठवाड्यात येत्या आठवड्यात हवामान कोरडे राहणार असून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये १३.६ अंशांची नोंद झाली. जळगावात आज १०.४ अंशांची नोंद झाली. १५ अंशांच्या खाली तापमान गेल्याने बहुतांश ठिकाणी हुडहुडी भरवणारी थंडी आहे.

आज राज्यातील किमान तापमान किती होते?

Station

Min Temp (oC)

Ahmednagar

14.3

Alibag

18.5

Aurangabad

13.6

Beed

13.4

Dahanu

21.1

Harnai

24.4

Jalgaon

10.4

Jeur

14.0

Kolhapur

17.0

Mahabaleshwar

14.6

Malegaon

13.2

Mumbai-Colaba

23.2

Mumbai-Santacruz

21.0

Nanded

13.0

Nasik

15.0

Osmanabad

16.4

Parbhani

12.9

Ratnagiri

23.5

Sangli

16.0

Satara

16.6

Sholapur

17.0

Udgir

10.4

 

टॅग्स :तापमानहवामान