राज्यात उन्हाचा चटका वाढला असून उष्णतेने नागरिक त्रस्त आहेत. किमान व कमाल तापमानात प्रचंड वाढ होत असून शनिवारी सोलापूर जिल्ह्यात ४३.२ अंश तापमानाची सर्वाधिक नोंद झाली. उर्वरित जिल्ह्यांमध्येही ४० ते ४५ अंशांची नोंद होत असून उष्ण झळांमुळे जीव कासाविस होत आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या विशेष तापमान बुलेटीननुसार,सोलापूरमध्ये सर्वाधिक तापमान होते. मराठवाड्यात सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. यावेळी संपूर्ण मराठवाड्यात ४० ते ४३ अंशांची नोंद झाल्याचे पहायला मिळाले. पुढील २४ तासांत तापमानात ४ ते ५ अंश एवढी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
राज्यात इथे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते.
अकोला ४३.४सोलापूर ४३.२चंद्रपूर ४२.८गडचिरोली ४२.८अमरावती ४२.८.नांदेड ४२.६जळगाव ४२.४बीड ४२लातूर ४१.८धाराशिव ४१.५ परभणी ४१.६सांगली ४१यवतमाळ ४१छत्रपती संभाजीनगर ४०.४ नगर ४०पुणे ४०.१सातारा ४०.२नागपूर ४०