Join us

Temperature today: पुण्यात ४०.४, तुमच्या शहरात आज काय आहे तापमानाचा पारा?

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 31, 2024 10:41 AM

नागपूर ४३.७ तर छत्रपती संभाजीनगर ४३.४ अंशावर गेले आहे. तुमच्या शहरात काय असेल तापमान? जाणून घ्या...

राज्यात वाढत्या तापमानाचा पारा वाढत असून उन्हाळा असह्य होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाच्या झळांमुळे राज्यात नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. पुण्यात आज ४०.४ अंश कमाल तापमानाची नोंद होत असून विदर्भ मराठवाड्यात ४५ अंशांपर्यंत तापमान जात आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या तापमानाच्या अंदाजानुसार जळगावमध्ये आज ४४.६ अंश तापमान राहण्याचा अंदाज आहे. येथे आज सर्वाधिक तापमान राहणार असून नागपूर ४३.७ तर छत्रपती संभाजीनगर ४३.४ अंशावर गेले आहे.

अकोल्यात आज ४४.१ अंश कमाल तापमान राहणार असून धुळे ४०.७ तर हिंगोली ४०, लातूर ४१.८, नांदेड ४०..७, धाराशिव ४२.५, सोलापूर येथे ४२.६अंश तापमानाची नोंद होत आहे.

मराठवाड्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला असल्याने किमान तापमानात  घट झाल्याचे पहायला मिळाले तर कमाल तापमानही मागील दोन दिवसांच्या तूलनेत काही अंशांनी कमी होते.

राज्यात पुढील दोन दिवस तापमान चढेच राहणार असून बहुतांश ठिकाणी ४० अंशांच्या वर पारा जाण्याची शक्यता आहे. व त्यानंतर विदर्भ व मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान आज कोणत्या भागात काय असेल तापमान?

S NO.जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर३९.६२४.३
2अहमदनगरकोपरगाव39.922.0
3अहमदनगरराहुरी३८.४२२.७
4अकोलाAKOLA_AMFU४४.१२५.७
औरंगाबादऔरंगाबाद४३.४२४.७
6औरंगाबादAURANGABAD_KVK३८.६२३.०
बीडअंबेजोगाई  
8भंडारासाकोली_केव्हीके३८.१22.0
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३७.२22.2
10चंद्रपूरSINDEWAHI_AMFU३८.१२३.७
11धुळेधुळे४०.७२५.४
12गोंदियागोंदिया  
13हिंगोलीहिंगोली40.0२२.७
14जळगावचोपडा  
१५जळगावजळगाव४४.६२५.२
16जालनाजालना३९.० 
१७कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३८.२२३.८
१८लातूरलातूर४१.८२७.३
19MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३०.५२६.१
20MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३२.८२०.०
२१नागपूरनागपूर २३.५
22नागपूरNAGPUR_CITY४३.७ 
23नागपूरNAGPUR_KVK३८.९२३.०
२४नांदेडनांदेड४०.७२४.३
२५नंदुरबारNANDURBAR_KVK 29.3
२६नंदुरबारनवापूर  
२७नाशिककालवण३८.७22.0
२८नाशिकमालेगाव39.5२५.७
29उस्मानाबादउस्मानाबाद४२.५२७.५
३०उस्मानाबादTULGA_KVK३८.८२७.४
३१पालघरPALGHAR_KVK३२.९२३.७
32परभणीPARBHANI_AMFU४०.३22.3
३३पुणेNIMGIRI_JUNNAR३४.८२१.३
३४पुणेकॅगमो_शिवाजीनगर४०.४२४.१
35पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३४.७22.5
३६पुणेCME_DAPODI35.4२६.८
३७पुणेDPS_HADAPSAR_PUNE३९.२२६.०
३८पुणेINS शिवाजी_लोनावला३४.०२२.१
39पुणेKHUTBAV_DAUND३८.४२२.६
40पुणेलोनिकलभोर_हवेली३७.३२०.९
४१पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३६.८२२.७
42पुणेNIASM_BARAMATI३८.५२६.३
४३पुणेPASHAN_AWS_LAB३८.२२०.५
४४पुणेराजगुरुनगर४०.८२४.३
४५पुणेतळेगाव३८.६22.4
४६रायगडIIG_MO_ALIBAG३४.३२२.८
४७रायगडकर्जत39.5 
४८रत्नागिरीदापोली३४.६२२.७
49रत्नागिरीरत्नागिरी  
50साताराBGRL_KARAD29.8२२.८
५१सातारामहाबळेश्वर29.5२१.४
52सातारासातारा३८.७२४.६
५३सोलापूरMOHOL_KVK४०.९२५.८
५४सोलापूरसोलापूर४२.६२८.९
५५वर्धावर्धा४०.६२५.१
५६वाशिमWASHIM_KVK २५.८
टॅग्स :तापमानहवामानमहाराष्ट्र