Join us

Temperature today: वाढत्या कमाल तापमानाने काढला घाम, जळगावात आज ४७.८ अंश

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 28, 2024 9:27 AM

राज्यात पुढील दोन दिवस तापमान चढेच राहणार असून बहुतांश ठिकाणी ४० अंशांच्या वर पारा जाण्याची शक्यता आहे.

राज्यात वाढत्या तापमानाने घाम काढला असून विदर्भ मराठवाड्यात ४५ अंशांपर्यंत तापमान जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या तापमानाच्या अंदाजानुसार जळगावमध्ये आज ४७.८ अंश तापमान राहण्याचा अंदाज आहे. हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान असून नागरिक उन्हाच्या झळांनी हैराण झाले आहेत.

अकोल्यात आज ४६अंश कमाल तापमान राहणार असून जळगाव ४७.८, नागपूर ४५.५, सोलापूर ४२.२, धुळे ४३.४, छत्रपती संभाजीनगर ४३.५ अंश तापमानाची नोंद होत आहे.

राज्यात पुढील दोन दिवस तापमान चढेच राहणार असून बहुतांश ठिकाणी ४० अंशांच्या वर पारा जाण्याची शक्यता आहे. व त्यानंतर विदर्भ व मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान आज कोणत्या भागात काय असेल तापमान?

S NO.जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरकोपरगाव४०.३२२.१
2अहमदनगरराहुरी३८.८२१.७
3अकोलाAKOLA_AMFU४६.०२६.७
4औरंगाबादऔरंगाबाद४३.५२३.५
औरंगाबादAURANGABAD_KVK३९.०२१.९
6बीडअंबेजोगाई  
भंडारासाकोली_केव्हीके३७.५२१.५
8बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३८.६२२.६
बुलढाणालोणार २६.३
10चंद्रपूरSINDEWAHI_AMFU३८.३२५.०
11धुळेधुळे४३.४२५.६
12गोंदियागोंदिया  
13हिंगोलीहिंगोली३९.८२६.०
14जळगावचोपडा  
१५जळगावजळगाव४७.८२५.४
16जालनाजालना40.0२५.५
१७कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३८.८२३.१
१८लातूरलातूर४०.३२७.८
19MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा २५.०
20MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३१.७२१.२
२१नागपूरनागपूर २२.६
22नागपूरNAGPUR_CITY४५.५22.3
23नागपूरNAGPUR_KVK39.1२२.६
२४नांदेडनांदेड४१.०२६.३
२५नंदुरबारनवापूर  
२६नाशिककालवण४१.२२३.७
२७नाशिकमालेगाव४१.८२६.२
२८उस्मानाबादउस्मानाबाद४१.२29.1
29उस्मानाबादTULGA_KVK३८.४२३.२
३०परभणीPARBHANI_AMFU४०.४२३.०
३१पुणेNIMGIRI_JUNNAR३७.३22.5
32पुणेकॅगमो_शिवाजीनगर४०.८22.2
३३पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA35.820.2
३४पुणेDPS_HADAPSAR_PUNE४०.४२४.४
35पुणेINS शिवाजी_लोनावला35.0१९.४
३६पुणेKHUTBAV_DAUND४०.४ 
३७पुणेलोनिकलभोर_हवेली३७.७१९.८
३८पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३७.९२०.९
39पुणेNIASM_BARAMATI३८.४ 
40पुणेPASHAN_AWS_LAB39.3१९.३
४१पुणेराजगुरुनगर४१.३२०.६
42पुणेतळेगाव40.0२१.४
४३रायगडIIG_MO_ALIBAG३८.३२३.१
४४रायगडकर्जत४०.१२३.७
४५रत्नागिरीदापोली३४.१२२.८
४६रत्नागिरीरत्नागिरी  
४७साताराBGRL_KARAD३१.९२०.८
४८सातारामहाबळेश्वर३०.८२१.४
49सातारासातारा३८.८२४.८
50सोलापूरMOHOL_KVK४०.१२२.८
५१सोलापूरसोलापूर४२.२२८.४
52वर्धावर्धा४१.०२४.७
५३वाशिमWASHIM_KVK 29.9
टॅग्स :तापमानहवामान