Join us

temperature today: आज राज्यातील हे जिल्हे सर्वाधिक तापणार! हवामान विभागाचा अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 17, 2024 9:50 AM

आज या जिल्ह्यात राहणार सर्वाधिक तापमान,जाणून घ्या तुमचं शहर आहे का...

राज्यात उन्हाचा दाह वाढला आहे. सुर्य आग ओकत असून तापमान ४५ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असले तरी तापमानाचा पारा कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. दिवसभर तीव्र उन्हाने नागरिक हैराण झाले आहेत.  

दरम्यान, आज या जिल्ह्यांमध्ये ४३ अंश सेल्सियसहून अधिक तापमान जाणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तापमान चढे राहणार असून रात्रही उष्ण असणार आहे. 

मराठवाडा तापणार!

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज ४५.९ अंश कमाल तापमान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काल जिल्ह्यात उष्णतेचा उच्चांक होता. तर धाराशिव, लातूरमध्ये ४२.१ अंशावर पारा जात आहे.

विदर्भात धडकी भरवणारे ऊन

विदर्भात अवकाळी पावसाला पोषक वातावरण असले तरी तापमानाचा पारा धडकी भरवणारे असल्याचे सांगितले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज  वाशिम जिल्ह्यात तापमान ४७.७ अंशांवर जाण्याचा अंदाज असून नागपूर ४६.५ जळगाव ४८.२, अकोला ४६.९ अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या जिल्ह्यांमध्ये आज असणार सर्वाधिक तापमान

जिल्हाकमाल तापमानकिमान तापमानआर्द्रता
जळगाव४८.२२८.०३१
वाशिम४७.७२८.८५५
अकोला४६.९२६३३
नागपूर४६.५२३.१५१
छ.संभाजीनगर४५.९२६.३२८
धुळे४४.७२९.५२६
रायगड, कर्जत४४.६२८.९४६
नाशिक४२.९२५२७
लातूर४२३०
पुणे४१.७२५.१३१
नगर४१.३२५.४४२
हिंगोली४१२७.५५०
धाराशिव४२.९३०.९२३
परभणी४०.२२६.४२८

 

टॅग्स :तापमानहवामान