Lokmat Agro >हवामान > मराठवाड्यात तापमानात होणार घट! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

मराठवाड्यात तापमानात होणार घट! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

Temperature will drop in Marathwada! What is the weather forecast? | मराठवाड्यात तापमानात होणार घट! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

मराठवाड्यात तापमानात होणार घट! काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

पश्चिम हिमालयीन भागात सध्या  वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे.

पश्चिम हिमालयीन भागात सध्या  वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील पाच दिवसात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे.  पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे.

पश्चिम हिमालयीन भागात सध्या  वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे. त्या प्रभावामुळे उत्तरेत येत्या दोन दिवसात पावसाची शक्यता आहे. काी ठिकाणी वादळी वाऱ्यासह हिमवृष्टी होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात येत्या काही दिवसात थंडी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 23 ते 29 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.दरम्यान, सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

Web Title: Temperature will drop in Marathwada! What is the weather forecast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.