Lokmat Agro >हवामान > Dimbhe Dam डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झाले रिकामे

Dimbhe Dam डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झाले रिकामे

The catchment area of Dimbhe Dam has become empty | Dimbhe Dam डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झाले रिकामे

Dimbhe Dam डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र झाले रिकामे

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे चालू वर्षी झपाट्याने रिकामे झाले असून या परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे चालू वर्षी झपाट्याने रिकामे झाले असून या परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

संतोष जाधव
तळेघर/भीमाशंकर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरामध्ये असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे चालू वर्षी झपाट्याने रिकामे झाले असून या परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

दि. ८ मे रोजी डिंभे धरणाचापाणीसाठा हा १४.१९ टक्के एवढा शिल्लक राहिला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे या वर्षी या भागामधील भीमाशंकर पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तुडुंब भरून वाहत होते.

यामुळे या परिसरातील पाटण म्हाळुंगे, कुशिरे खु, कुशिरे तु, मेघोली, दिगद, वेंढारवाडी ही गावे ओलिताखाली येऊन या भागातील आदिवासी शेतकरी हा उपसा सिंचनाद्वारे मोठ्या प्रमाणात रबी पिके घेऊ लागला.

या पाणलोट क्षेत्रातून पाणी उपसा करून बाजरी, गहू, बटाटे, कांदे, मेथी, कोथिंबीर यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेऊ लागला; परंतु जसजशी उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तसतशी डिंभे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. यामुळे या वर्षी लवकरच डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र रिकामे झाले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे या खोरे हा परिसर मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजले जाते. पावसाळ्यामध्ये चार महिने या भागामध्ये राहणाऱ्या जनतेला सूर्य व चंद्राचे दर्शनही घडत नाही.

चार महीने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण करत पाण्यासाठी पायपीट करावी लागते. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी बांधवांना दुष्काळाचे हाल सोसावे लागत आहेत.

या भागातील विहिरी, शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, तळी, डव्हरी, इत्यादी उपलब्ध असणारे जलस्रोत पावसाळ्ळ्यामध्ये तुडुंब भरतात; परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही. पावसाळ्यामध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे म्हाळुंगे कुशिरेदरम्यान डिंभे धरणाचा मागील बाजूस असणारा फुगवटा हा मोठ्या प्रमाणात भरला जातो.

त्याच प्रमाणे या पाणलोट क्षेत्रामध्ये पाटण पिंपरी व पिंपरी म्हाळुंगे हद्दीमध्ये छोट्या छोट्या कोल्हापुरी पद्धतीने बंधारे बांधून पाणी अडविले जात आहे व त्या कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यातून उपसा सिंचन करून या भागामध्ये बागायती शेती केली जात होती; परंतु गतवर्षर्षापेक्षा चालू वर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला.

त्याच प्रमाणे डिंभे धरणातून वारंवार पूर्व भागासाठी कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा हा १४.१९ टक्के एवढाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे हे पाणलोट क्षेत्र आता रिकामे झाले आहे.

आदिवासींना वाटीने टिपावे लागले झऱ्यातील पाणी
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोयामध्ये असणाऱ्या सावरली, पिंपरी साकेरी, नानवडे, ढकेवाडी, मेघोली, बेडारवाडी गावांच्या अत्यंत हाकेच्या अंतरावर डिंभे धरण असून या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करत दुष्काळाचे हाल सोसावे लागत आहेत. या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र व यावा धरणाचा फुगवटा या गावांच्या उशाल असूनही या गावांतील आदिवासी बांधवांना वाटीने झप्यातून पाणी टिपावे लागत आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये जसजसा उन्हाळा जाणवू लागला आहे. तसतशा दुष्काळाच्या झळा या भागातील आदिवासी जनतेला सोसाव्या लागत आहेत.

अधिक वाचा: Ujani Dam इतिहासात प्रथमच एवढं मोठ धरण वजा ६० टक्क्यांपेक्षा खाली जाण्याचा अंदाज

Web Title: The catchment area of Dimbhe Dam has become empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.