Join us

धरणसाठा खालावतोय! आता राज्यातील धरणांमध्ये किती पाणी उरलंय?

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 17, 2024 9:17 AM

राज्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. दरम्यान राज्यातील धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. ...

राज्यात तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली असून बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. दरम्यान राज्यातील धरणांमधीलपाणीसाठा वेगाने कमी होत आहे. उन्हाचा कडाका वाढत असून पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे.

राज्यात सहा महसूल विभागांत लहान, मध्यम, मोठी २९९४ धरणे आहेत. या सर्व धरणांमध्ये आता ४९.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. हाच पाणीसाठा मागील वर्षी ६९.७८ टक्के एवढा होता.

जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ २७.२२ टक्के पाणीसाठा उरला असून इतर विभागांच्या धरणसाठ्याच्या तुलनेत हा पाणीसाठा सर्वात कमी आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा ७३.५८ टक्के एवढा होता. त्यामुळे यंदा उन्हाळ्याच्या आणि पाणीटंचाईच्या तीव्र झळा मराठवाड्याला बसण्याची शक्यता आहे. आता मराठवाड्यातील एकूण ९२० धरणांमध्ये केवळ १९७६.७३ दलघमी पाणीसाठा राहिला आहे. 

नाशिक आणि पूणे विभागातील धरणसाठाही वेगाने घटत असून नाशिकच्या एकूण ५३७ धरणांमध्ये ५१.८३ टक्के तर पुण्याच्या एकूण ७२० धरणांमध्ये ५१.४१ टक्के पाणी शिल्लक आहे. नागपूर विभागातील ३८३ धरणांमध्ये ५८.०९ टक्के पाणी शिल्लक असून अमरावती विभागात २६१ धरणांमध्ये ६०.४४ टक्के पाणीसाठा राहिला आहे. कोकणातील एकूण १७३ धरणांमध्ये ६३.४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

जायकवाडीत केवळ ३१.६९%

जायकवाडीत दिनांक १६ फेब्रुवारी रोजी ३१.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच दिवशी तो ८९.८७ टक्के होता.

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाई