Join us

धरणसाठा झपाट्याने खालावतोय, जायकवाडी,येलदरीसह उर्वरित धरणात उरलाय एवढा पाणीसाठा

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 14, 2024 10:53 AM

मराठवाड्यातील धरणसाठा खालवतोय, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती उरलंय पाणी?

राज्यात तापमानाने चाळीशी पार केली असून उन्हाचा पारा वाढत जात आहे. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. धरणसाठा वेगाने घटू लागला आहे.

औरंगाबाद  विभागातील ९२० लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये आता केवळ २२.३६ टक्के पाणी उरले आहे. राज्यातील विहिरी, तलाव, इतर जलसाठे कोरडे होत आले आहेत. जनावरांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत होत आहे. दरम्यान, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पाणीटंचाई असणाऱ्या क्षेत्रात पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित- राज्यातील पाणीप्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत ही महत्वाची चर्चा, शेतकऱ्यांसाठी काय?

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात आता २४.३५ टक्के पाणीसाठा राहिला असून ५२८.६६ दलघमी पाणी शिल्लक आहे. म्हणजे केवळ १८.६६ टीएमसी पाणी आता शिल्लक आहे.  मागील वर्षी यादरम्यान ५२.३६ टक्के पाणीसाठा होता. औरंगाबाद विभागातील ४४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांमध्ये आता फक्त २५.२७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

बीडमधील मांजरा धरणात आता ९.९१ टक्के पाणी शिल्लक राहिले असून माजलगाव धरण शुन्यावर गेले आहे. हिंगोलीच्या येलदरी धरणात आता ४०.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून ११.६५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच सिद्धेश्वर धरणात ७.७४ टीएमसी पाणी उरले आहे.

Weather Report : महाराष्ट्रात उन्हाचं स्वरूप ते पावसाची शक्यता आहे काय? जाणून घ्या हवामान अंदाज 

नांदेडच्या निम्न मनार धरणात  आता ३३.५९ टक्के पाणी शिल्लक असून दीड टीएमसी पाणीसाठा उरला आहे.  दिग्रस धरणात २२.८४ टक्के पाणी राहिले असून या धरणात अर्धा टीएमसी पाणी उरले आहे. विष्णूपूरी धरण सध्या ४८.२९ टक्के भरलेले असून त्यात आता १.३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

धाराशिवच्या निम्न तेरणा धरणात केवळ ५.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून तेरणा शुन्यावर जाऊन पोहोचले आहे. तर सिना कोळेगाव धरण कोरडे झाले आहे.लातूरचा खूलगापूर धरणसाठा आता शून्यावर गेला असून बहुतांश धरणांची अशीच स्थिती आहे. परभणीच्या निम्न दुधना धरणात आता १०.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाऊण टीएमसी पाणी उरले आहे.

 

टॅग्स :धरणपाणीजायकवाडी धरणमराठवाडापाणी टंचाई