Join us

फेब्रुवारीतच धरणांनी गाठला तळ.. बसणार दुष्काळाची झळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:57 AM

राज्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठला असून, गतवर्षींच्या तुलनेत सरासरी २१.६१ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील १२ प्रकल्प सध्या मायनसमध्ये असून, १५ धरणांमध्ये जेमतेम दहा टक्क्यांच्या आसपास साठा आहे. परिस्थिती मराठवाड्याची चिंताजनक आहे, मराठवाड्यात फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

बाळासाहेब बोचरेमुंबई : राज्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठला असून, गतवर्षींच्या तुलनेत सरासरी २१.६१ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील १२ प्रकल्प सध्या मायनसमध्ये असून, १५ धरणांमध्ये जेमतेम दहा टक्क्यांच्या आसपास साठा आहे. परिस्थिती मराठवाड्याची चिंताजनक आहे, मराठवाड्यात फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो ७२ टक्के होता.

- राज्यातील १३८ प्रमुख धरणांत गतवर्षी ७४.३४ टक्के साठा होता, तो सध्या ५०.३७ टक्क्यांवर आला आहे. - २६० मध्यम प्रकल्पांत गतवर्षी ६७.६८ टक्के साठा होता, तो यंदा ५३.०३ टक्क्यांवर आला आहे.- २,५९६ लघु प्रकल्पांत गतवर्षी आज रोजी एकूण पाणीसाठा ५५.६४ टक्के होता, तो ३९.१५ टक्क्यांवर आला आहे.- २,९९४ प्रकल्पांत गतवर्षी ७०.७० टक्के असलेला साठा यंदा ४९.०९ टक्क्यांवर आला असून. तो २१.६१ टक्के कमी आहे.

१२ धरणे मायनसमध्येराज्यातील कलीसरार (गोंदिया), खडकपूर्णा (बुलढाणा), बोरगाव अंजनपूर व सिरसमार्ग (बीड), मंगरुळ किनवट (नांदेड), किल्लारी, मदनसुरी, सीना कोळेगाव, राजेगाव (धाराशिव), शिवणी (लातूर), लोणावळा टाटा (पुणे) आणि उजनी (सोलापूर).

१९ फेब्रुवारी रोजी राज्यातील धरणातील स्थिती

विभागएकूण प्रकल्पआजचा पाणीसाठागतवर्षीचा पाणीसाठा
नागपूर३८३५७.६६%५८.३९%
अमरावती२६१५९.९६%७२.५८%
छत्रपती संभाजीनगर९२०२६.२९%७२.७३%
नाशिक५३७५०.८३%७०.२५%
पुणे७२०५०.७९%७४.३१%
कोकण१७३६३.२०%६६.०३%

१५ धरणे जेमतेमलोअर दुधना (लातूर) १३.४०%टाकळगाव देवळा (लातूर) ४.९२%बिदगीहाळ (लातूर) १७.७८%साई (लातूर) १५.५६%तगरखेडा (धाराशिव) १२.१९%लोअर तेरणा (धाराशिव) ८.२१%लिबाळा (धाराशिव) ६.९०%गुंजरगा (धाराशिव) ८.०३%मंगरूळ (नांदेड) १५.६४%हिरडपुरी (नांदेड) २.७९%रोशनपुरी (बीड) १२.८६%मांजरा (बीड) १२.९६%माजलगाव (बीड) २.४४%मिडल वैतरणा (कोकण) ११.८२%टेमघर (पुणे) १०.८४%

टॅग्स :धरणपाणीदुष्काळमहाराष्ट्रउजनी धरणमराठवाडा