Join us

धरणातील पाणीसाठ्यानुसार पाण्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

By मुक्ता सरदेशमुख | Published: August 22, 2023 7:45 PM

राज्यभर पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ...

राज्यभर पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमधीलपाणीसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यातील पर्जन्यमान व पाण्याचा नियोजनाबाबत बैठक झाली. यावेळी जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा नियोजन विकास समितीतून निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात कोकण व नागपूर विभागात हलका पाऊस झाला आहे मात्र नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती या विभागात पाऊस झालेला नाही. राज्यात सरासरीच्या २५ ते ५० टक्के पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या १५ असून ५० ते ७५ टक्के पर्जन्यमान झालेल्या तालुक्यांची संख्या १०८ तर ७५ ते १०० टक्के पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांची संख्या १३८ असून ९४ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

खरीप २०२३ मध्ये आतापर्यंत १३८.४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा या पाच जिल्ह्यात अधिकतम पेरणी झाली असून सोयाबीन व कापूस पिकाची अधिकतम पेरणी या हंगामात झाले आहे. राज्यात सध्या ३५० गावे, १३१९ वाड्यांमध्ये ३६९ टॅंकरद्वारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात सर्वत्र पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे आगामी काळात चांगला पाऊस व्हावा अशी अपेक्षा आहे. मात्र, सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला तर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजनांना सुरूवात करावी. त्यामध्ये धरणातीलपाणी साठा पाहून जिल्हाधिकारी यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून काटकसरीने पाणी वापराचे नियोजन करावे. ग्रामीण भागात देखील विहिरी, तलावातील उपलब्धता पाहून पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

  

टॅग्स :धरणपाणीपाणीकपातएकनाथ शिंदेमराठवाडामोसमी पाऊसपाऊसमराठवाडा वॉटर ग्रीड