नाशिक येथील हवामानतज्ज्ञाने उत्तर भारतात नुकत्याच आलेल्या भूकंपाचे भाकीत खरे ठरले आहे. प्रा. किरणकुमार जोहरे असे त्यांचे नाव असून ते इलेक्ट्रॉनिक्स सायन्सचे प्राध्यापक आहेत. तसेच भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरीऑलॉजीचे इन्स्ट्रूमेंटेमेशन अँड ऑब्झरवेशनल टेक्निक (आय अँड ओटी) विभागाचे माजी शास्त्रज्ञ असून लोकमत ॲग्रोमध्ये हवामान सजगतेवर किकुलॉजी हे सदर लिहितात.
प्रा. जोहरे हे मागील ३० वर्षांपासून हवामानाचा अभ्यास करत आहे. मॉन्सूनबरोबरच भूकंप, ढगफुटी हवामानात होणारे बदल असे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. त्यावर ते शेतकरी व सामान्यांना नियमित मार्गदर्शनही करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून दि. २१ जुलै २०२३ रोजी पुढील ३० दिवसांच्या आत उत्तर भारताला ५ रिश्टर स्केल पेक्षा जास्त मोठा भुकंपाचा धक्का बसणार आहे, अशी भुकंप भविष्यवाणी त्यांनी केली होती. ५ ऑगस्ट २०२३ रोजी बरोबर १५ दिवसांनी रात्री साडे नऊ वाजता ५.८ रिश्टर स्केलच्या धक्काने उत्तर भारत हादरल्याने ती खरी ठरली आहे.
प्रा. जोहरे यांनी स्वतः तयार केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या सहाय्याने शोधलेल्या ईक्यू क्लाऊड (भुकंप ढग) च्या माहितीचा वापर नैसर्गिक बुद्धिमत्ता (एनआय) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरत भुकंपाचा २१ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांनी आगाऊ इशारा दिला होता. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत सतर्कतेचे उपाय करावेत अशी विनंती यंत्रणांना करत, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह विविध मान्यवरांना ट्वीटमध्ये टॅगही केले होते.
याआधी नाशिक,उत्तराखंड,कोयना परिसर,पालघर, जयपूर, दिल्ली याठिकाणी प्रा. जोहरे यांनी इशारा दिल्यानंतर साधारणतः एक महिन्याच्या आत भुकंप झाले आहेत. गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून हवामानाचा ते अभ्यास करीत असून ढगांची प्रत्यक्ष पाहणी करून तसेच हवामानातील तापमान आणि आर्द्रता आदी विविध घटकांचा सखोल अभ्यास करीत यांच्यामधील अनियमितता व विसंगती यांची नोंद इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर घेतली आहे.