नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई, रोजगार, गुरांना चाऱ्याचा प्रश्न या बाबींची गंभीरता लक्षात घेऊन चर्चा करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे व चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांच्या उपस्थितीत येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यात दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
पावसाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरीही तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची दाहकता लक्षात घेता चणकापूर धरणाचे पूरपाणी चनकापूर उजव्या कालव्याद्वारे पोलीस बंदोबस्तात प्रथमतः रामेश्वर धरणात व त्यानंतर गटविकास अधिकारी राजेश तालुक्यातील पूर्व भागासाठी परसुल देशमुख, उमराणे बाजार समितीचे धरणात टाकण्याचे नियोजन सभापती प्रशांत देवरे, माजी सभापती करण्यात येत असल्याची माहिती विलास देवरे, माजी जि. प. सदस्य पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली. यावेळी शासकीय उपसभापती धर्मा देवरे, देवानंद वाघ अधिकारी, तहसिलदार सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे उपस्थित होते.
• ज्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची आवश्यकता असेल अशा गावांची मागणी त्वरित गटविकास अधिकारी यांच्याकडे नोंदवावी. त्याबाबत त्वरित दाखल घेतली जाईल, असे आश्वासन मंत्री भुसे यांनी देऊन सर्व शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्याचे आवाहन केले. जेणेकरुन त्यांना पिक विमा देणे सुलभ होईल. नुकसानीचा अंदाज शासनास येईल.
• त्याचबरोबर चायाचा प्रश्नाबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या बाबतचे नियोजन लवकरच करण्यात येईल, असे सांगून उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्याचबरोबर रोजगाराचा प्रश्न लक्षात घेऊन रोजगार हमी योजनेतील कृती आराखड्यातील सर्व कामांच्या मागण्या त्वरित शासनाकडे कळवण्याची आदेश संबंधित विभागांना दिले.