Lokmat Agro >हवामान > थंडीचा जोर वाढला, गहू पीक जोमदार 

थंडीचा जोर वाढला, गहू पीक जोमदार 

The force of cold increased, the wheat crop was vigorous | थंडीचा जोर वाढला, गहू पीक जोमदार 

थंडीचा जोर वाढला, गहू पीक जोमदार 

थंडी वाढल्याने गव्हाला पोषक वातावरण मिळत असून गत वर्षापेक्षा यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.

थंडी वाढल्याने गव्हाला पोषक वातावरण मिळत असून गत वर्षापेक्षा यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

थंडी वाढल्याने गहू, हरभऱ्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसांत थंडीचा जोर ओसरला होता. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना कांदा पिकाला बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे फवारणी करावी लागली होती. मात्र आता पुन्हा थंडीचा जोर वाढत असल्याने आता पिके जोमदार दिसत आहेत. यामुळे गव्हाला पोषक वातावरण मिळत असून गत वर्षापेक्षा यंदा गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.

सद्यस्थितीत महाराष्ट्रभर गारठा वाढला असून गव्हासह काही पिकांना पोषक वातावरण मिळते आहे. दरम्यान कांद्याच्या चढउतार भावामुळे गव्हाकडे शेतकरी वळला आहे. कोरडवाहू शेतीतील हरभरा, ज्वारी ही पिके वाढत्या थंडीमुळे चांगले आहेत, रात्री व पहाटे प्रचंड प्रमाणात गारवा असतो, गहू पिकाला उत्पादक युरिया हे रासायनिक खते देत आहेत. तर नुकतीच लागवड झालेल्या कांदा पिकाला तणनाशक फवारणी शेतकरी करीत आहेत. रब्बी हंगामातील पिकांना वाढणारी थंडी पोषक असून पिके दमदार आहेत. कांद्याच्या भावात होत असलेल्या चढ-उतारामुळे आता गव्हाकडे शेतकरी वळला आहे. शिवाय यंदा पाऊस कमी झाल्याने काही भागात भूजलपातळीत वाढ झाली नाही, त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी हरभरा, दादर अशी कमी पाण्यावर येणारी पिके घेतली आहेत.

रब्बीची पिके बहरण्यास मदत 

हिवाळ्याचे दोन महिने उलटूनही फारशी थंडी जाणवली नाही. मध्यंतरी वातावरण बिघडल्याने कधी ढगाळ तर दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली. त्यामुळे अनेक पिकांवर विपरीत परिणाम झाला. मात्र आता गुलाबी थंडी सुरु असल्याने रब्बी पिकांना वरदान ठरत आहे आहे. आगामी काळात थंडीचा कडाका कायम राहिला तर रब्बीची पिके बहरण्यास मात्र मदत होईल. तसेच यापुढे आहे ती भूजलपातळी घट होण्याची शक्यता आहे. हा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे असल्याचे शेतकरी किशोर पाटील यांनी सांगितले. तसेच शेती सिंचनासाठी लागणारा वीजपुरवठा फक्त ८ तासच मिळतो, तोही बऱ्याच वेळी कमी दाबाने मिळतो. अशा अनेक समस्यांनी रब्बी हंगामात जास्त पाणी लागणारे पिके घेण्याची मर्यादा शेतकऱ्यांना आल्याचे त्यांनी सांगितले. 

अशी घ्या काळजी 

दरम्यान यंदा गव्हाची चांगली लागवड झाली असून आता हळूहळू थंडीतही वाढ होत असल्याने गहू पिकाला पोषक वातावरण मिळण्यास मदत होत आहे. या आठवड्यात थंडी चांगली असल्याने रब्बी हंगामात गहू हरभऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल. या वातावरणात एकरी 3 ते 4 फोरमन लावावेत, जेणेकरून अंडी घालणारे पतंग या ट्रॅपमध्ये अडकतील. शेतामध्ये ठिकठिकाणी टी आकाराचे पक्षी थांबे उभारावेत, जेणेकरून त्या ठिकाणी पक्षी थांबतील. त्यामुळे शेतातील अळीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी दिली.

Web Title: The force of cold increased, the wheat crop was vigorous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.