Lokmat Agro >हवामान > उजनीवर पावसाचा जोर वाढला; धरणात किती पाणी आले?

उजनीवर पावसाचा जोर वाढला; धरणात किती पाणी आले?

The force of rain increased on Ujani dam; How much water came in the dam? | उजनीवर पावसाचा जोर वाढला; धरणात किती पाणी आले?

उजनीवर पावसाचा जोर वाढला; धरणात किती पाणी आले?

गुरुवारपासून पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस सुरू असून १९ पैकी ७ धरणातून एकूण २२ हजार ५२४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.

गुरुवारपासून पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस सुरू असून १९ पैकी ७ धरणातून एकूण २२ हजार ५२४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर जिल्ह्याची कृषी संजीवनी म्हणून ओळखले जाणारे उजनी धरण ४३ वर्षांच्या इतिहासात १८ टक्के एवढ्या नीचांकी पातळीवरच रिंगाळत आहे. असे असले तरी गुरुवारपासून पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस सुरू असून १९ पैकी ७ धरणातून एकूण २२ हजार ५२४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा दर वाढला असून घोड, भीमा व मुळा-मुठा या नद्यांच्या खोऱ्यात दमदार पाऊस झाला आहे. मागील २४ तासात उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या धरण क्षेत्रात पुढीलप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. पिंपळ जोगे ४० मि.मी., माणिक डोह ६० मि.मी., केडगाव ४२ मि.मी. वडज ४३ मि.मी. डिंभे ५६ मि.मी., चिल्हेवाडी २६ मि.मी., कळमोडी ३२ मि.मी. चासकमान २४ मि.मी. भामा आसखेड २०मि.मी., वडिवळे ६८ मि.मी., पवना ७३ मि.मी., आंध्रा ३० मि.मी., कासार साई २२ मि.मी. मुळशी ३२ मि.मी. तर टेमघर १० मि.मी. पाऊस झाला आहे. उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या १९ धरणांपैकी तीन- चार धरणे वगळता सर्व धरणे १५ ते १०० टक्के भरलेली आहेत. गुरुवारपासून दमदार पाऊस चालू असल्याने चासकमान धरणातून ३६५८ क्युसेक, आंध्रा येथून १८३ क्युसेक, कासारसाईमधून ४५० क्युसेक, वडिवळे धरणातून ६४१६ क्युसेक, तर पवना धरणातून ४३२६ क्युसेक चिलेवाडी २५० क्युसेक कळमोडी ३२८४ क्युसेक असा एकूण २२५२४ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

४३ वर्षांत इतिहासात प्रथमच भीषण परिस्थिती
पावसाळा चालू होऊन तीन महिने संपले तरी उजनी धरण अद्याप १८ टक्क्यावरच रेंगाळत आहे. अशी परिस्थिती उजनी धरणाच्या ४३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांची चिता वाढली आहे. मागील काळात २०००, २००१, २००२ व २००३ असे सलग चार वर्षे उजनी धरण १०० टक्के न भरता ते ६० ते ७० टक्केच भरले होते तर २०१५-१६ साली दुष्काळ पडल्यानेही उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नव्हते. त्यावर्षी शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.

धरणाची सद्य:स्थिती
एकूण पाणीपातळी - ४९२.३३५ मीटर
एकूण जलसाठा - ७३.३३ टीएमसी
उपयुक्त जलसाठा - ९.६७ टीएमसी
टक्केवारी - १८.०६

Web Title: The force of rain increased on Ujani dam; How much water came in the dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.