Join us

थंडीचा जोर ओसरतोय! आज राज्यात कोणत्या जिल्ह्यात कसे होते तापमान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: January 29, 2024 9:41 AM

लातूरमध्ये १९.९ अंश, नांदेडमध्ये १७

राज्यात किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने थंडींचा जोर ओसरत असल्याचे दिसून आले.लातूर जिल्ह्यात १९.९ अंश तापमानाची नोंद झाली तर सोलापूर १८ अंशांवर पोहोचले आहे.राज्याला कडाक्याच्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार आज लातूरमध्ये १९.९ अंश तापमानाची नोंद झाली. तर नांदेडमध्ये १७ अंश किमान तापमान नोंदवले गेले. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान १८ अंशांवर गेले आहे. थंडीचा जोर हळुहळु ओसरत असल्याचे दिसत आहे.

पश्चिम हिमालयीन व परिसरात वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे. मागील चार दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाल्याचे दिसून आले.  दरम्यान मराठवाड्यात किमान तापमान चढल्याचे आज दिसून आले. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हुडहुडी कायम आहे.

मुंबई पुण्यात काय स्थिती?

मुंबईत किमान तापमान चढत असून कुलाबामध्ये २३.७ अंश तापमान होते. तर सांता क्रूज भागात १८.४ अंश तापमानाची नोंद झाली.

पुण्यात शिवाजीनगर परिसरात १५.१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. दौंडमध्ये १४.५, बारामती १६.०, तर पाषाण भागात १२.४ अंशांची नोंद झाली.

मराठवाड्यात पारा चढता..

मराठवाड्यात तापमानाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. धाराशिवमध्ये १७.८ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. जालन्यात १५ अंश तर हिंगोलीत १४.८ तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

कोणत्या भागात कसे होते तापमान?

DISTRICT

STATION

TEMP MAX ('C)

TEMP MIN ('C)

AHMEDNAGAR

AHMEDNAGAR

29.8

14.4

AHMEDNAGAR

KOPERGAON

30.1

14.3

AHMEDNAGAR

RAHURI

31.7

13.7

AKOLA

AKOLA_AMFU

32.8

13.3

AMRAVATI

AMRAVATI

32.7

12.7

AURANGABAD

AURANGABAD_KVK

29.2

14.5

BEED

AMBEJOGAI

  

BHANDARA

BHANDARA

  

BHANDARA

SAKOLI_KVK

30.0

11.2

BULDHANA

BULDHANA_KVK

28.8

13.8

BULDHANA

LONAR

31.1

16.1

DHULE

DHULE

34.9

15.9

GADCHIROLI

GADCHIROLI_KVK

31.2

 

HINGOLI

HINGOLI

30.1

14.8

JALGAON

CHOPDA

  

JALGAON

JALGAON

35.1

14.7

JALNA

JALNA

30.5

15.0

KOLHAPUR

KOLHAPUR_AMFU

30.8

16.5

LATUR

LATUR

33.1

19.9

MUMBAI_CITY

MUMBAI_COLABA

30.5

23.7

MUMBAI_CITY

MUMBAI_SANTA_CRUZ

34.5

18.4

NAGPUR

NAGPUR

 

13.2

NAGPUR

NAGPUR_CITY

32.3

11.5

NAGPUR

NAGPUR_KVK

29.7

12.4

NANDED

NANDED

31.5

17.0

NANDURBAR

NANDURBAR_KVK

31.7

13.4

NANDURBAR

NAVAPUR

  

NASHIK

KALWAN

32.9

13.0

NASHIK

MALEGAON

31.6

16.3

OSMANABAD

OSMANABAD

32.9

17.8

OSMANABAD

TULGA_KVK

29.8

15.0

PALGHAR

PALGHAR_KVK

31.1

19.2

PARBHANI

PARBHANI_AMFU

30.7

12.0

PUNE

NIMGIRI_JUNNAR

 

15.7

PUNE

CAGMO_SHIVAJINAGAR

33.5

15.1

PUNE

CHRIST_UNIVERSITY_LAVASA

29.6

14.5

PUNE

CME_DAPODI

31.6

16.7

PUNE

INS SHIVAJI_LONAVALA

31.1

15.6

PUNE

KHUTBAV_DAUND

30.6

14.5

PUNE

LONIKALBHOR_HAVELI

29.9

13.0

PUNE

NARAYANGOAN_KRISHI_KENDRA

29.7

13.6

PUNE

NIASM_BARAMATI

30.3

16.0

PUNE

PASHAN_AWS_LAB

30.8

12.4

PUNE

RAJGURUNAGAR

32.9

15.4

PUNE

TALEGAON

32.2

14.3

RAIGAD

IIG_MO_ALIBAG

35.9

19.1

RAIGAD

KARJAT

35.4

15.8

RATNAGIRI

DAPOLI

34.9

17.1

RATNAGIRI

RATNAGIRI

  

SATARA

BGRL_KARAD

26.1

12.8

SATARA

MAHABALESHWAR

24.7

16.0

SATARA

SATARA

30.4

16.1

SINDHUDURG

DEVGAD

35.0

 

SOLAPUR

MOHOL_KVK

31.7

13.3

SOLAPUR

SOLAPUR

33.8

18.1

WARDHA

WARDHA

31.6

14.3

WASHIM

WASHIM_KVK

30.2

11.8

YAVATMAL

YAVATMAL

31.0

18.5

 

टॅग्स :तापमानहवामानमराठवाडामुंबईपुणे