Lokmat Agro >हवामान > हवामान बदलात शेती करताय? आता सुरक्षित अन्नसाखळीसाठी सरकारने तयार केलाय नवा मंच

हवामान बदलात शेती करताय? आता सुरक्षित अन्नसाखळीसाठी सरकारने तयार केलाय नवा मंच

The government will invest to protect the food chain from climate change through agriculture | हवामान बदलात शेती करताय? आता सुरक्षित अन्नसाखळीसाठी सरकारने तयार केलाय नवा मंच

हवामान बदलात शेती करताय? आता सुरक्षित अन्नसाखळीसाठी सरकारने तयार केलाय नवा मंच

हवामान अद्यावत शेतीसाठी सरकारची गुंतवणूक, हवामान लवचिक कृषी अन्नप्रणालीसाठी सरकारने केला नवा मंच सुरु

हवामान अद्यावत शेतीसाठी सरकारची गुंतवणूक, हवामान लवचिक कृषी अन्नप्रणालीसाठी सरकारने केला नवा मंच सुरु

शेअर :

Join us
Join usNext

भारतात हवामानाच्या सततच्या बदलांमध्ये शेतीत अनेक बदल घडताहेत.  या बदलांना लवचिकतेने हाताळत शेती करणं जाेखमीचं काम. अन्नसुरक्षेकडे लक्ष देण्यासाठी आता सरकारने कंबर कसली असून यासाठी निती आयोग, शेतकरी संघटना आणि वित्तीय संस्था एकत्र येत एक मंच तयार केला आहे. शेतीतून सुरक्षित अन्नसाखळी तयार करण्यासाठी हा मंच आहे.

याकरता सरकारने निवेदन प्रसिदध केले असून, भारतातील खासगी क्षेत्र तसेच शेतकरी संघटना आणि वित्तीय संस्थांमध्ये हवामान प्रतिबंधक कृषी खाद्य प्रणाली विकसित करण्यासाठी गुंतवणूक आणि भागीदारी विकसित करणे हे या उपक्रमाचे उदिष्ट असल्याचे यात म्हटले आहे.

हवामान लवचिक कृषी अन्नप्रणालीसाठी सरकारने नवा गुंतवणूक मंच सुरु केला आहे. निती आयोग,कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने आणि संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेचा हा संयुक्त उपक्रम आहे.

देशातील हरितवायू उत्सर्जनात १३ टक्क्याहून या क्षेत्राचे योगदान आहे. शेतजमिनींवर वृक्षारोपण करून कार्बन जप्त करण्यात शेती मोठी भूमिका बजावू शकते असे निरिक्षण केले आहे. नैसर्गिक संसाधने, हवामान बदल आणि भावी पिढ्यांवर त्याचे होणारे परिणाम तसेच त्यांना पुरेसे अन्न पिकवण्यासाठी आवश्यक संसाधने मिळतील याची खात्री करण्यासाठी आम्हाला कृषी क्षेत्रातील हवामानातील लवचिकतेमध्ये गुंतवणूक वाढवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

या बैठकीला सरकार, नाबार्ड, भारतीय कृषी संशोधन परिषद, अर्ध शुष्क उष्ण कटिबंधीय आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था, जागतीक बँक, इंटरनॅशनल फूड पॉलिसी अशा अनेक वरिष्ठ संस्थांचे जवळपास २०० प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: The government will invest to protect the food chain from climate change through agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.