Join us

पाऊस गेला, जीव टांगणीला! पांढऱ्या आकाशाने शेतकऱ्यांचे ठोके वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2023 11:32 AM

गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली ...

गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून आहेत. भुईमूग, नागली, भात पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रोज उठले की पांढरे शुभ्र आकाश दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. पिकांना मारक, तर किडींना पोषक वातावरण असल्याने किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला असल्याचे चित्र आहे.

यंदा वरुणराजाच्या मनात काय आहे, हेच कळेना झाले आहे. जून महिना कोरडा गेला, त्यानंतर जुलैमध्ये बन्यापैकी पाऊस झाल्याने पेरण्या होऊ शकल्या. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उघडझाप राहिल्याने पिकांची वाढ सुरू झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः माळरानावरील भुईमूग, भात, नागली ही पिके धोक्यात आली आहेत. नदी व विहिरीवरील विद्युत पंपाची वीज सोडवलेली आहे. त्यामुळे जिथे पाण्याची सोय आहे; पण वीज नसल्याने विद्युत पंप सुरू करता येईनात, गेल्या वर्षी २२ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी १०४१ मिलिमीटर पाऊस झाला होता. यंदा तो ७९९ मिलिमीटरवरच थांबला आहे.

ऑगस्टमध्ये घामाच्या धारा

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याचा पारा 32 डिग्री पर्यंत पोहोचला आहे. दुपारी तर अंग भाजून निघत आहे. ऑक्टोबरची हिट जाणवू लागली असून, अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरानावरील पिकांनी माना टाकल्या असून, भात पिकांची वाढच खुंटली आहे. आणखी चार ते आठ दिवस पावसाने पाठ फिरवली तर शेतकरी आर्थिक संकटात येणार आहे. 

जिल्ह्यात 96 टक्के पेरण्या

जून महिना कोरडा केल्याने जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या. जिल्ह्याचे १ लाख जून महिना कोरडा गेल्याने जुलैमध्ये मोठ्या ९२ हजार ६३३ हेक्टर पेरक्षेत्र आहे. त्यापैकी यंदा १ लाख ८६ हजार १६७ हेक्टर (९६.७६ (टक्के) पेरणी झालेली आहे.

आठवडाभर पावसाची शक्यता धूसरच 

एकूणच हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगाम आठवडाभर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता धूसर आहे. काही ठिकाणी तुरळक सरी कोसळतील, मात्र शेतीला अपेक्षित पाऊस पडणार नाही.

"कोल्हापूर शहर व जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात पुढील आठवड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हातकणंगले व शिरोळ तालुक्यात हलक्या सरी कोसळतील"- राहुल पाटील, मुख्य प्रबंधक, हवामान साक्षरता अभियान

'तांबेरा', 'करपा' किडीचा प्रादुर्भाव

किडीला पोषक असेच सध्या वातावरण आहे. त्यामुळे सोयाबीन, भात, भुईमूग पिकांवर 'तांबेरा', करपा या किडीचा प्रादुर्भाव अधिक जाणवू लागला आहे. उसावरही लोकरी माव्याचे संकट आले आहे. आगामी काळात जोरदार पाऊस झाला नाही तर हा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ओढे- नाले आटले

यंदा जुलै महिन्यात ओव्या- नाल्यांना पाणी आले; मात्र पावसाने दडी मारल्यानंतर त्यातील पाणीही आटले आहे. ओया-नाल्यातील पाणी माळरानावरील पिकांना आधार असतो. यातच पाणी नसल्याने आकाशाकडे बघत बसावे लागत आहे.

टॅग्स :हवामानशेतकरीपीक व्यवस्थापनपाऊसमोसमी पाऊसशेतीखरीप