Join us

पाऊस थांबला..धरणसाठाही घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 9:56 AM

सातारा जिल्ह्यात प्रमुख सहा प्रकल्पात १२८ टीएमसीच पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी पाणी कमी आहे. तर यंदा प्रमुख धरणेही १०० टक्के भरलेली नाहीत.

मान्सून परतला असून, यंदा पावसाबरोबरच धरणातील साठाही घटला आहे. कारण, प्रमुख सहा प्रकल्पात १२८ टीएमसीच पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टीएमसी पाणी कमी आहे. तर यंदा प्रमुख धरणेही १०० टक्के भरलेली नाहीत त्यातच पूर्व भागातही एकदम कमी पाऊस झाल्याने सिंचनासाठी धरणातून पाणी मागणी वाढणार आहे. 

सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पडतो, यावर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. यंदा मात्र, मान्सूनच्या पावसाने साफ निराशा केली आहे. पूर्व भागात तर दुष्काळी परिस्थिती उदभव आहे. पाझ तलाव कोरडे पडले असून, ओढ्यात ठणठणाट आहे. यामुळे रब्बी हंगाम घेण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी अशी प्रमुख धरणे आहेत. या धरणातून पिण्यासाठी आणि सिंचनासाठीही पाण्याची तरतूद केलेली आहे. या सर्व प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७६ टीएमसी इतकी आहे. पण, यंदा मान्सूनच्या पावसाने सरासरीही गाठली नसल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, एकाही धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे पुढील पावसाळ्यापर्यंत पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. परिणामी आहे त्या साठ्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करावा लागणार आहे.

कोयनेत ९४ टीएमसी पाणी- राज्यातील मोठ्या धरणांपैकी एक कोयना आहे. १०५.२५ टीएमसी धरण आहे. या धरणात ९३.९९ टीएमसीच पाणीसाठा झालेला आहे. टक्केवारीत हे प्रमाण ८९.३० इतके आहे.- या धरणातील पाण्यावर सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. मागणीनुसार धरणातून पाणी सोडण्यात येते.- यंदा धरणात १२ टीएमसी पाणीसाठा कमी आहे. यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर योग्यरितीने करावा लागणार आहे.

उरमोडीत अवघा ५८ टक्क्यांवर साठासातारा तालुक्यातील परळी खोयात उरमोडी धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता ९.९६ टीएमसी इतकी आहे." पण, या धरणक्षेत्रात कमी पाऊस झाला. परिणामी धरणात १५.८३ टीएमसीच साठा झालेला आहे. ५८.५९ टक्के धरण भरलेले आहे. त्यातच या धरणातील पाण्यावर सातारा पाणी आणि शेती पाण्याचा प्रश्न अवलंबून असतो. धरण तालुक्याबरोबरच माण आणि खटाव तालुक्यातील पिण्याचे भरले नसल्याने आवर्तनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

येरळवाडीत शून्य टक्के साठाखटाव तालुक्यात येरळवाडी धरण आहे. या १ धरणाची पाणीसाठवण क्षमता १.१५ टीमसी आहे. पावसाने यंदाही पाठ फिरविली असून, धरणसाठा झालाच नाही. सध्या या धरणात ०.२७ टीएमसी म्हणजे शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यातच या धरणात खटावमधील अनेक गावांच्या पाणी योजना अवलंबून असतात. त्यामुळे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई भासणार आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणाचा साठा (टीएमसीमध्ये)

धरणेगतवर्षीयावर्षीयंदाची टक्केवारीएकूण क्षमता
धोम१३.५०१०.६८७९.०७१३.५०
कण्हेर१०.०९८.१३८०.५३१०.१०
कोयना१०४.६१९३.९९८९.३०१०५.२५
बलकवडी४.०८३.८१९३.५०४.०८
उरमोडी९.९४५.८३५८.५९९.९६
तारळी५.७३५.८३९५.६०५.८५

 

टॅग्स :धरणपाऊसपाणीपाणी टंचाईसाताराकोयना धरण