राज्यात सोमवारी रात्री राज्यात अनेक भागात अवकाळी पावसासह जोरदार गारपीट झाली. वादळी वाऱ्यसह अनेक भागात गारांचा पाऊस झाला असून रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यासह, जळगाव, नांदेड, बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गारपीटीमुळे गहू, हरभरा, ज्वारी व फळपिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागात गेल्या दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. आता या अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली असून, यापूर्वी झालेल्या अवकाळीनेदेखील रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता.
जाफराबाद तालुक्यात सोमवारी सायंकाळी अचानक गारपीट होऊन रथधी हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जाफराबाद परिसरातील गौधनखेडा, नळविहिरा, खामखेडा, सावंगी, टेभूर्णी, डावरगाव देवी, भातोडी, सावरगाव म्हस्के, भातोडी, दहिगाव, हिवराकाचली, कुंभारझरी खानापूर, निमखेडा खुर्द, आंबेगाव, डहाकेवाडी, गाढेगव्हाण, अकोलदेवसह पूर्णा नदीच्या सावंगी, टेभूर्णी या भागांत गारांचा थर जमा झाल्याने गहू, हरभरा, शालू ज्वारी, मका, नेटशेडचे मोठे नुकसान आले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानाची शासनाने तत्काळ दाखल घेऊन पंचनामे न करता एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
अनेक ठिकाणी गारांचा पाऊस
भोकरदन तालुक्यातील नेहा, हिंसोडा, पारध परिसरात सोमवारी वादळी वायासह मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस झाला. यावेळी पारध, दानापूर परिसरातील शेतकयांनी गारा जमा करून त्याचे फोटो काढून त्या सोशल मीडियावरही टाकल्या आहेत.
• आता शेतकयांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटांनी हिरापून घेतला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.