Join us

तापमानाची चाळीसपार उड्डाणे, नागरिकांना उष्णतेचा दाह सोसवेना

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 01, 2024 10:21 AM

दुपारच्या वेळी उकाड्याने आणि उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान विदर्भात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात तापमानाच्या पाऱ्याची चाळीसपार उड्डाणे होत असताना उष्णतेचा दाह प्रचंड वाढला आहे. दुपारच्या वेळी उकाड्याने आणि उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, विदर्भात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज दि १ एप्रील रोजी राज्यात अकोल्यात सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस कमाल तापमानाची शक्यता असून जळगावात ४३.६ अंशांपर्यंत पारा गेला आहे. मागील चार दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये साधारण तापमान ४३ ते ४५ अंश एवढेच दिसून येत आहे.

छत्रपती संभाजीनगर ४२.३ अंशांवर

मराठवाड्यात अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मागील दोन दिवस तापमान १ ते २ अंशांनी घटले होते. मात्र, कमाल तापमानात फारसा बदल झाला नसून आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४२.३ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

लातूर, धाराशिव चाळीसपार

लातूर, धाराशिव जिल्ह्यात तापमानाचा पारा चाळीसपार गेला असून ४०.१ आणि ४१.१ अंश तापमानाची नोंद होत असून परभणी ३६.३, सोलापूर ४२.१, नांदेड ३६.३, जालन्यात ३६.४ अंश तापमान नोंदवले गेले.

पुण्यात आज ३६ ते ३९ अंशांची नोद होत असून साताऱ्यात ३७.५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे.

जाणून घ्या उर्वरित राज्यात कसे आहे तापमान..

 

S NO.जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर३८.५२१.५
2अहमदनगरकोपरगाव३९.७२०.०
3अहमदनगरराहुरी३८.१२१.२
4अकोलाAKOLA_AMFU४३.८२५.३
औरंगाबादऔरंगाबाद४२.३२१.५
6औरंगाबादAURANGABAD_KVK३७.८22.3
बीडअंबेजोगाई  
8भंडारासाकोली_केव्हीके३६.९२१.८
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३६.९२५.५
10बुलढाणालोणार३९.४२६.७
11चंद्रपूरSINDEWAHI_AMFU३७.२२४.०
12धुळेधुळे४२.१22.4
13गोंदियागोंदिया  
14हिंगोलीहिंगोली३७.२२३.८
१५जळगावचोपडा  
16जळगावजळगाव४३.६२४.२
१७जालनाजालना३७.९२३.१
१८कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३७.९२३.०
19लातूरलातूर४०.१२७.३
20MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३०.९२६.६
२१MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३४.०२१.२
22नागपूरनागपूर३८.८२३.२
23नागपूरNAGPUR_CITY४१.६22.2
२४नागपूरNAGPUR_KVK३७.०२२.७
२५नांदेडनांदेड३६.३२५.३
२६नंदुरबारNANDURBAR_KVK २८.९
२७नंदुरबारनवापूर  
२८नाशिककालवण३८.८२०.१
29नाशिकमालेगाव४१.३२३.८
३०उस्मानाबादउस्मानाबाद४१.१२७.५
३१उस्मानाबादTULGA_KVK३८.७२५.०
32पालघरPALGHAR_KVK३३.९२४.४
३३परभणीPARBHANI_AMFU३६.३२१.७
३४पुणेNIMGIRI_JUNNAR३६.४२४.८
35पुणेकॅगमो_शिवाजीनगर३९.६२१.९
३६पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३६.२२१.५
३७पुणेCME_DAPODI३६.४२८.७
३८पुणेDPS_HADAPSAR_PUNE३९.४२४.८
39पुणेINS शिवाजी_लोनावला३६.३22.3
40पुणेKHUTBAV_DAUND३७.०22.2
४१पुणेलोनिकलभोर_हवेली३६.४१९.७
42पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३७.२२१.५
४३पुणेNIASM_BARAMATI३७.२२१.७
४४पुणेPASHAN_AWS_LAB३७.३१८.९
४५पुणेराजगुरुनगर४०.२20.2
४६पुणेतळेगाव३८.१२१.४
४७रायगडIIG_MO_ALIBAG३६.०२३.६
४८रायगडकर्जत४१.८२२.१
49रत्नागिरीदापोली३६.७२१.३
50रत्नागिरीरत्नागिरी  
५१साताराBGRL_KARAD३२.३२१.४
52सातारामहाबळेश्वर३०.६22.4
५३सातारासातारा३७.५२४.९
५४सोलापूरMOHOL_KVK39.9२४.४
५५सोलापूरसोलापूर४२.१२७.५
५६वर्धावर्धा३९.६२५.०
५७वाशिमWASHIM_KVK २५.५
टॅग्स :तापमानहवामान