निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी आज अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यशस्वी झाल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
ऊर्ध्व प्रवरा निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड आदींची प्रमुख उपस्थिती होती. संक्रातीदिवशी (दि १५ जानेवारी) ऊर्ध्व प्रवरा निळवंडेच्या उजव्या धरणातून पाणी सोडण्यात आले होते. डाव्या कालव्याप्रमाणे उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्यावरील शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. वरच्या भागातील कालव्यांच्या कामांना सुरूवात झाल्यामुळेच पाणी शेवटच्या गावाला मिळण्यात यश आले असल्याचेही पालकमंत्री विखे पाटील म्हणाले.
संक्रांतीच्या मुहूर्तावर निळवंडे धरणातून आवर्तन सोडले, जाणून घ्या सविस्तर
एवढ्या गावांना होणार लाभ
८४ किमी असणाऱ्या उजव्या कालव्याचा अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यातील ६९ गावांना याचा लाभ होणारआहे. उजव्या कालव्यातून सुमारे दीड टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगत लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे व जलस्रोतांना एक नवसंजीवनी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
डाव्या कालव्यातील पाणी सोडल्यानंतर काही गावांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव महामंडळाच्या नियामक मंडळाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.या नुकसानीची मदत लवकर मिळावी याकरीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून विनंती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दळवळणाकरीता १२३ लोखंडी पुलाची मागणी असून या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यासाठी पाठपुरवा करण्याची ग्वाहीही पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.