Join us

नीरा खोऱ्यातील धरणामधील पाण्याची पातळी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 4:31 PM

निरा खोऱ्यातील धरणावर पाऊस बरसला असून, सर्व धरणातील पाणीसाठा वाढत असून, सोमवारी १ जुलै रोजी निरा खोऱ्यातील गुंजवणी, निरा देवघर, वीर, भाटघर धरणावर पावसाला सुरुवात झाली.

नातेपुते : निरा खोऱ्यातील धरणावरपाऊस बरसला असून, सर्व धरणातीलपाणीसाठा वाढत असून, सोमवारी १ जुलै रोजी निरा खोऱ्यातील गुंजवणी, निरा देवघर, वीर, भाटघर धरणावर पावसाला सुरुवात झाली.

दोन दिवसांत अर्धा टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली असून, चारही धरणातील पाणीसाठा सरासरी टक्केवारी १२.७८ टक्के असून, उपयुक्त पाणीसाठा ६.१७ टीएमसी असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत २.२१ टक्के जादा पाणीसाठा आहे.

रविवारी व सोमवारी चारही धरणावर जोरदार पाऊस झाल्याने गुंजवणी पाणलोट क्षेत्रात ६४ मिमी, भाटघर धरण क्षेत्रात १९०, वीर धरण क्षेत्रात ४५, निरा-देवघर धरण क्षेत्रात १६३ मिमी पाऊस पडला असून, भाटघर धरणावर १२, निरा- देवघर धरणावर २६, गुंजवणी धरणावर २० मिमी पाऊस पडला आहे.

निरा खोऱ्यातील धरणावर पाऊस पडत असन धरण क्षेत्रातील फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला लाभ क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिक सुखावला असून, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

निरा खोरे अहवालानुसार पाणीपातळी- गुंजवणी १५.१ टक्के (उपयुक्त पाणीसाठा ०.५५ टीएमसी)- भाटघर ९.९१ टक्के (उपयुक्त पाणीसाठा २.३२ टीएमसी)- निरा-देवघर ११.१ टक्के (उपयुक्त पाणीसाठा १.३० टीएमसी)- वीर धरण २१.११ टक्के (उपयुक्त पाणीसाठा १.१८ टीएमसी)

अधिक वाचा: Ujani Dam उजनीच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ

टॅग्स :धरणपाणीपाऊसनदीपुणे